Bhumi Pednekar – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत असते. पण, आता भूमी तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर बहीण समिक्षामुळे चर्चेत आहे. अलीकडेच भूमी तिची बहीण समिक्षा पेडणेकरसोबत मुंबईत स्पॉट झाली होती आणि त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पापाराझी खूपच गोंधळलेले दिसले. आधी त्यांनी समिक्षाला भूमी समजले. समीक्षाचे त्यांनी व्हिडिओ आणि फोटोही काढले.
View this post on Instagram
अशात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघ्या बहिणी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर जात आहे. यावेळी जेव्हा अभिनेत्री आपल्या बहिणीसोबत कारमधून बाहेर पडली तेव्हा पापाराझींनी समिक्षाला भूमी समजले आणि नंतर भूमी पेडणेकर कारमधून बाहेर आली तेव्हा तिला पाहून ते गोंधळले. व्हिडिओमध्ये पापाराझी ‘एक्झॅक्टली सेम टू सेम’ म्हणताना ऐकू येत आहे. यावर लोक भरपूर कमेंट करत आहेत. भूमी पेडणेकरच्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर एकाने लिहिले, ‘त्या जुळ्या बहिणी आहे का असा प्रश्न आता चाहत्यांकडून विचारला जात आहे.
दरम्यान, भूमी पेडणेकरच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये शहनाज गिल, डॉली सिंग आणि कुशा कपिला या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. यासोबतच ती ‘द लेडी किलर’मध्येही दिसली होती.