बॉलिवूड देसी गर्लची साऊथ चित्रपटसृष्टीत एंन्ट्री! फर्स्ट लूक आला समोर; महेश बाबूसोबत स्क्रिन करणार शेअर

Priyanka Chopra : प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली लवकरच एक मोठा अॅक्शन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. राजामौली यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांचे नाव केवळ साऊथ चित्रपट इंडस्ट्रीपुरते मर्यादित नसून ते आता ग्लोबली पोहचले आहेत. ते त्यांच्या ‘ग्लोबट्रोटर’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.
या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. चित्रपटाचा पहिला लूक समोर आला असून, पहिल्या पोस्टरमधून बॅालिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
या दोघांनाही मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. बॅालिवूडमध्ये एंन्ट्री केल्यानंतर प्रियांकांने हॅालिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाची छाप पाडली आहे. आता ती साऊथ इंडस्ट्रीत ‘ग्लोबट्रोटर’ चित्रपटाद्वारे पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
View this post on Instagram
नुकताच चित्रपटातील प्रियांका चोप्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे. “जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीला नवी ओळख देणारी महिला…देसी गर्लचे (प्रियंका चोप्रा) पुन्हा स्वागत आहे! मंदाकिनीच्या असंख्य छटा जगानं पाहाव्यात, यासाठी मी उत्सुक आहे. अशा शब्दांत एस.एस.राजामौली यांनी प्रियांका चोप्राचे कौतुक पोस्टर शेअर करत केले आहे.
प्रियांकाने देखील तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ग्लोबट्रोटर’ चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. पोस्टमध्ये प्रियांका चोप्राचा डॅशिंग लूक दिसत आहे. पिवळी साडी, हातात बंदूक आणि पायात कोल्हापूरी चप्पल घालून प्रियांका अॅक्शन अवतारात दिसत आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने खास कॅप्शन दिले आहे. “ती दिसते त्यापेक्षा जास्त आहे… हॅलो मंदाकिनीला…” या पोस्टवर चाहत्यांनी तिला केमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ग्लोबट्रोटर’ चित्रपटात प्रियांका चोप्रा ‘मंदाकिनी’ची भूमिका साकारणार आहे.





