Asia Cup 2025 : आजपासून रंगणार आशिया कपचा थरार! सामने कधी, कुठे आणि कसे पाहता येणार? जाणून घ्या

आशिया कपचा पहिला सामना कधी होणार?
एशिया कप 2025 चा पहिला सामना मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबु धाबी येथे होईल.
सामने किती वाजता खेळवले जातील?
आशिया कपचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सायंकाळी 7:30 वाजता होईल.
हेही वाचा – Asia Cup 2025 : पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळेल का? कर्णधार सूर्यकुमार यादवने दिले ‘हे’ उत्तर!
आशिया कपचे सामने कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहता येतील?
आशिया कप 2025 चे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. प्रेक्षक सोनी स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये समालोचनासह सामने पाहू शकतात.
मोबाइल किंवा लॅपटॉपवर सामने कसे पाहता येतील?
या टूर्नामेंटचे सर्व सामने सोनी लिव्ह ॲपवर थेट प्रक्षेपित केले जातील. मात्र, यासाठी प्रेक्षकांना सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
हेही वाचा – रोहित शर्माचा कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
सुपर-4 सामने कधी सुरू होतील?
आशिया कपमधील सुपर-4 सामने 20 सप्टेंबरपासून खेळवले जातील. यापूर्वी 9 ते 19 सप्टेंबरदरम्यान लीग फेरीचे सामने होतील. दोन गटांमधील प्रत्येकी दोन अव्वल संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील.
आशिया कपचा अंतिम सामना कधी होणार?
आशिया कप 2025 चा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबई येथे होईल. सुपर-4 मधील अव्वल दोन संघांमध्ये हा अंतिम सामना रंगेल.
आशिया कपसाठी सर्व आठ देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणासाठी स्टार स्पोर्ट्स किंवा जिओहॉटस्टारवर सामने उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांना सोनी लिव्ह ॲपद्वारे सामने पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.





