Asia Cup 2025 : पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळेल का? कर्णधार सूर्यकुमार यादवने दिले ‘हे’ उत्तर!

Asia Cup 2025 Suryakumar Yadav on Sanju Samson : आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होत आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबई येथे युएईविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे संजू सॅमसनला या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल का? हा प्रश्न भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. याबाबत त्यानी काय उत्तर दिले जाणून घेऊया.
सॅमसनच्या स्थानाबाबत सूर्यकुमार काय म्हणाला?
आशिया कप 2025 मध्ये अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्या सलामी जोडीची जवळपास खात्री मानली जात आहे. संजू सॅमसनचा मधल्या फळीतील कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाही. याबाबत सूर्यकुमार यादवला विचारले असता तो म्हणाली, “मी तुम्हाला प्लेइंग इलेव्हन खेळाडूंची यादी मेसेज करतो. आम्ही संजू सॅमसनची खूप काळजी घेत आहोत. काळजी करू नका, आम्ही उद्या योग्य निर्णय घेऊ.” त्यानी संजू सॅमसनला संपूर्ण स्पर्धेत योग्य संधी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
तयारीबाबत सूर्यकुमारचे मोठे वक्तव्य –
🗣️ We’ve had good preparations and time together as a team#TeamIndia captain Suryakumar Yadav talks about the importance of preparations ahead of #AsiaCup2025 @surya_14kumar pic.twitter.com/OsU5HWcLKI
— BCCI (@BCCI) September 9, 2025
भारतीय संघाने यंदा जानेवारीत आपली शेवटची टी-20 मालिका खेळली होती. त्या मालिकेत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली होती. सामन्याच्या तयारीबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “आमच्या खेळाडूंनी एकत्र फारसे सामने खेळले नसले, तरी आयपीएलमध्ये त्यांनी चांगला वेळ घालवला आहे. आम्ही एक संघ म्हणून जानेवारी-फेब्रुवारीत एक मालिका खेळलो होतो. आयपीएलमुळे खेळाडूंचा खेळाचा सराव सुरू होता. जूननंतर आम्ही एकत्र कोणतीही स्पर्धा खेळलो नाही, पण हीच या स्पर्धेतील खरे आव्हान आहे. आम्ही हे आव्हान स्वीकारतो आणि उद्यापासून काय होते ते पाहू.”
हेही वाचा – रोहित शर्माचा कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये जातानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक –
आशिया कप 2025 मधील दुसरा सामना आणि भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी दुबईत युएईविरुद्ध होणार आहे. गट ‘अ’ मध्ये भारतासह पाकिस्तान, ओमान आणि यूएई या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी भारत आपला शेवटचा गट सामना ओमानविरुद्ध खेळणार आहे. सुपर-4 सामने 20 सप्टेंबरपासून सुरू होतील, तर अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होईल.





