Pune District : गणेगावात धारिवाल कुटुंबीयांचा सन्मान

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्याचे भूषण, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धरिवाल यांची कन्या चि.सौ. का. साक्षी व वर रोहित यांच्या विवाहानिमित्ताने प्रकाश शेठ धरिवाल यांचे मूळ गाव असलेल्या गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राम दैवत दंडवत कार्यक्रमास गणेगाव खालसा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोहळ्यासाठी गावातील अबालवृद्ध व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकाश धारिवाल हे गावच्या विकासासाठी जे काही योगदान देत आहेत.
त्याबद्दल गणेगाव खालसा ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून प्रकाशशेठ धारिवाल व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. धारिवाल कुटुंबीयांनी गावाशी ऋणानुबंध जपला आहे.
प्रकाश धारिवाल यांनी गावविकासात मोलाचा वाटा उचलला आहे. या विकासाच्या योगदानाबद्दल गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा सन्मान केला. यावेळी आयोजित कार्यक्रमास संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते.





