UAE Beat India : युएईकडून भारताचा सर्वात लाजिरवाणा पराभव! हाँगकाँग सिक्सिजमधून टीम इंडिया थेट बाहेर; पाहा नेमकं काय घडलं?
UAE Beat India : हाँगकाँग सुपर सिक्सेस २०२६ मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. युएई आणि भारत यांच्यातील सामन्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Hong Kong Super Sixes 2026 India Knocked Out UAE Clinch Victory : हाँगकाँग सुपर सिक्सिज २०२६ या स्पर्धेत भारताची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. साखळी फेरीत एकही सामना जिंकता न आल्याने भारतीय संघाला पहिल्याच टप्प्यात स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेत सहभागी १२ संघांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात आली होती. भारत, पाकिस्तान आणि यूएई यांचा समावेश असलेल्या क गटात (Group C) युएईच्या संघाने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले; तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
युएईने भारताला १० चेंडू राखून चारली धूळ –
स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय आवश्यक होता. मात्र, कर्णधार कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाची नोंद करण्यात सपशेल अपयशी ठरला. युएईने भारताचा १० चेंडू शिल्लक राखून पराभव करत स्पर्धेतील सर्व समीकरणे उलथवून लावली. अव्वल खेळाडूंचा भरणा असतानाही मैदानावर भारतीय खेळाडू निष्प्रभ ठरले.
नटराजनची ३८ धावांची झुंज; आघाडीची फळी पत्त्यासारखी कोसळली
🚨 UAE QUALIFIED FOR HONG KONG SIXES 2026 SEMI-FINAL!! 🔥
– UAE BEAT INDIA BY 6 WICKETS IN HONG KONG SIXES!! 🔥
India in Hong Kong sixes 2026:
INDIA lose by 4 wickets vs PAKISTAN.
INDIA lose by 6 wickets vs UAE. https://t.co/uujD51JGgR— M Farhan (@MFarhan1200) October 31, 2026
प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ षटकांत ९४ धावा उभारल्या. सलामीवीर नितीश राणा, राहुल तेवतिया आणि शशांक सिंग यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. राहुल त्रिपाठीने ७ चेंडूंत २४ आणि कर्णधार कृणाल पंड्याने ८ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. मात्र, संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात वेगवान गोलंदाज टी. नटराजनने सर्वाधिक योगदान दिले; त्याने १४ चेंडूंत ३८ धावांची तडाखेबंद खेळी केली.
बिनबाद ९७ धावा; युएईची वादळी फलंदाजी –
🚨India and Pakistan Has Been Knocked Out🚨
Today, UAE beat India by 6 wickets in Hong Kong Sixes match👏🏻
With this win, UAE have qualified for semi-finals, while India & Pakistan have both been knocked out of the tournament🤪
BTW, UAE has beaten both team quite comfortably💥 https://t.co/31ykp4EjgS
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) October 31, 2026
विजयासाठी मिळालेल्या ९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युएईने भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून हल्ला चढवला. युएईचे सलामीवीर खालिद शाह आणि अंशन टंडन यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या ४.२ षटकांत बिनबाद ९७ धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही आणि सामना एकतर्फी गमावला.
युएईने भारत आणि पाकिस्तान दोघांनाही पाठवलं घरी –
युएईने भारताआधी पाकिस्तानचाही पराभव केला होता. तर भारताला पहिल्या लढतीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. क गटात दोन्ही सामने जिंकून युएईने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तान एका विजयासह दुसऱ्या, तर दोन्ही सामने गमावणारा भारतीय संघ गटात तळाला राहून बाहेर पडला.





