Shubman Gill TEMPLE : शुबमन गिलने नेट्समध्ये सरावादरम्यान डोळ्याच्या बाजूला लावलेलं डिव्हाइस, नेमकं काय काम करतं?
Shubman Gill TEMPLE : शुबमन गिल न्यूझीलंडमध्ये सराव करताना दिसला. यावेळी त्याने 'टेम्पल' नावाचा फिटनेस ट्रॅकर डोळ्याच्या बाजूला लावला होता, ते नक्की कसे काम करते? जाणून घेऊया.

Shubman Gill Spotted With TEMPLE Smart Device On Forehead During New Zealand Practice : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुबमन गिल आगामी एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला असून त्याने कसून सरावाला सुरुवात केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना गिल पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता; मात्र सरावादरम्यान सर्वांचे लक्ष त्याच्या डोळ्याच्या बाजूला चिटकवलेल्या एका सोनेरी रंगाच्या अनोख्या उपकरणाने वेधून घेतले. हे खास फिटनेस डिव्हाइस ‘TEMPLE’ असून ते सध्या क्रीडा आणि तंत्रज्ञान विश्वात प्रचंड चर्चेचा विषय ठरले आहे.
दीपिंदर गोयल यांच्या स्टार्टअपची निर्मिती; १ नोव्हेंबरपासून प्री-ऑर्डर
डोळ्याच्या बाजूला लावण्यात येणारे हे उपकरण झोमॅटोचे (Zomato) सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या नव्या हेल्थ-टेक स्टार्टअपने विकसित केले आहे. भारतीय बाजारात या प्रीमियम गॅझेटची किंमत ८४,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांसाठी याचे प्री-ऑर्डर बुकिंग सुरू होत आहे. सामान्य स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडच्या तुलनेत हे डिव्हाइस अत्यंत प्रगत असून थेट मेंदूतील जैविक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
मेंदूतील रक्तप्रवाहावर थेट नजर; काय आहेत ‘TEMPLE’ चे फीचर्स?
🚨Shubman Gill, KL Rahul, Gurnoor Brar have joined the Indian squad but Gill was seen wearing fitness tracking device temple.
@CricSubhayan with the full report from Auckland#NZvIND https://t.co/nOh3cHhHYk
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 29, 2026
Next-gen training for the modern cricketer! 🏏
Shubman Gill spotted wearing the cutting-edge ‘Temple’ AI tracker on his forehead to monitor brain activity and focus. Peak performance science in action!
@Grok Tell me a little more about this device.
#DoglaHaiRathee
#ShameOnBhati https://t.co/WetUuvdglX— Jumla Junction (@ExposeJumla) October 29, 2026
‘TEMPLE’ हे उपकरण प्रामुख्याने मेंदूतील रक्तप्रवाह (Brain Blood Flow) तपासण्याचे काम करते. हे डिव्हाइस फक्त डोळ्याच्या बाजूला चिकटवावे लागते, त्यानंतर ते आपल्या अत्याधुनिक सेन्सर्सच्या साहाय्याने खेळाडूची ऊर्जा, मानसिक ताण आणि शारीरिक आरोग्य ट्रॅक करते. यात ‘ब्रेन फ्लो’ नावाचे विशेष फीचर आहे, जे मेंदूतील रक्ताभिसरण आणि सिग्नलचे विश्लेषण करते. तसेच यामध्ये १ ते २५० च्या दरम्यान ‘एन्ट्रॉपी स्कोअर’ दिला जातो, ज्यावरून शरीरात आणि मेंदूत वेगाने होणारे अंतर्गत बदल अचूकपणे समजतात.
पीपीजी तंत्रज्ञानाचा वापर; थेट मोबाईल ॲपवर रिअल-टाइम डेटा
🚨What is Temple, the device seen on Shubman Gill’s forehead?
Here are the details⬇️
@CricSubhayan @IDFCFIRSTBank || #INDvsNZ https://t.co/zhegqDKmDr
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 29, 2026
या गॅझेटमध्ये पीपीजी (फोटोप्लेथाइस्मोग्राफी) या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान त्वचेवर विशिष्ट प्रकाशाचा किरण टाकून रक्तातील सूक्ष्म बदलांची अचूक नोंद घेते. हे उपकरण अत्यंत कमी पॉवरवर काम करते. गोळा केलेला सर्व डेटा डिव्हाइसमधील इनबिल्ट सिस्टीमद्वारे त्वरित विश्लेषित केला जातो आणि ब्लूटूथद्वारे थेट खेळाडूच्या किंवा प्रशिक्षकाच्या मोबाईल ॲपवर दिसतो. यामुळे सरावादरम्यान गिलची एकाग्रता आणि फिटनेस लेव्हल समजण्यास मदत होत आहे.





