Homebound Movie : होमबाउंड चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
Homebound Movie : दिग्दर्शक नीरज घेवान यांचा बहुचर्चित होमबाउंड हा चित्रपट ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

Homebound Movie : दिग्दर्शक नीरज घेवान यांचा बहुचर्चित होमबाउंड (Homebound Movie) हा चित्रपट ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीत अंतिम ५ नामांकनांमध्ये स्थान मिळवण्यात या चित्रपटाला अपयश आले. गुरुवारी लॉस एंजेलिसमध्ये अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने या नामांकनांची अधिकृत घोषणा केली.
भारताचा अधिकृत प्रवेश असलेला हा चित्रपट १५ चित्रपटांच्या प्राथमिक शॉर्टलिस्टमध्ये पोहोचला होता, मात्र अंतिम टप्प्यात तो आपली मोहोर उमटवू शकला नाही. करण जोहर आणि अदर पूनावाला यांची निर्मिती असलेल्या या हिंदी चित्रपटाने(Homebound Movie) गेल्या वर्षी मे महिन्यात कान चित्रपट महोत्सवातील प्रतिष्ठित अन सर्टन रिगार्ड विभागात प्रीमियर झाला होता, तेव्हापासूनच याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या.
ज्येष्ठ पत्रकार बशारत पीर यांच्या न्यूयॉर्क टाइम्समधील टेकिंग अमृत होम या लेखावर आधारित या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसे हे देखील या चित्रपटाशी कार्यकारी निर्माता म्हणून जोडले गेले होते.
हे पण वाचा : नागपूरमध्ये भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला गंभीर दुखापत, पुढील सामन्यात खेळण्याबाबत सस्पेन्स






