Waqf Board CEO : वक्फ मंडळाच्या सीईओपदी फैयाज खान यांची नियुक्ती
सिडकोचे गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक फैयाज खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागामार्फत

मुंबई : सिडकोचे गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक फैयाज खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागामार्फत दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. वक्फ मालमत्तांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि विकास या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
यासंदर्भात राज्य सरकारने बुधवारी जाहिर केलेल्या आदेशानुसार फैयाज खान हे छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारतील. यापूर्वी सिडको मंडळामध्ये तब्बल ३१ पेक्षा अधिक वर्षांचा कार्यकाळ फैयाज यांनी केला. सिडकोच्या ठाणे व रायगड जिल्ह्यासह इतर संपादित जमीन क्षेत्राचे डिटीलायजेशन करून – पणन विभागाचा कारभार करून सिडकोच्या तिजोरीत सर्वाधिक संपत्ती कशी जमा होईल – यासाठी फैयाज हे प्रयत्नशील असायचे.
सिडकोच्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम पाहीले. दूरदृष्टीपूर्ण, परिणामकारक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा ठसा उमटवल्याने त्यांची वर्णी शासनाने या मंडळात लावल्याचे सांगीतले जाते. वसाहत विभाग, संगणक प्रणाली विभाग तसेच पणन विभागात त्यांनी राबवलेले उपक्रम प्रशासकीय सुधारणांसाठी मार्गदर्शक ठरल्याचे सिडकोने स्पष्ट केले.


