Akshaye Khanna | आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्यभूमिकेत आहे. मात्र सर्वत्र अभिनेता अक्षय खन्नाच्या धमाकेदार अभिनयाची मोठी चर्चा रंगली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक जणांनी देखील त्याच्या अभिनयाबद्दल पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. इतकेच काय तर, चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक फराह खान हिनं देखील अक्षय खन्नाच्या भूमिकेचे करत त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली आहे. फराह खाननं सोशल मीडियावर एक फॅन एडिट रील शेअर केली. या रीलमध्ये ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा सीन आणि ‘तीस मार खान’मधील एक दृश्य होतें. ‘तीस मार खान’मध्ये अक्षय कुमार अक्षय खन्नाकडं पाहून म्हणाला होता, “वो रहा मेरा सुपरस्टार, मेरा ऑस्कर.” धुरंधरमध्ये अक्षय खन्ना हा रेहमान डकैत याच्या (नकारात्मक) भूमिकेत दिसत आहे. हा गँगस्टर आपल्या चुलत भावासोबत आणि उप-कमांडर उझैर बलोचसोबत (दानिश पंडोर) लयारीवर राज्य करतो.व्हिलन असूनही त्याच्या भूमिकेचं, कामाचंच सर्वात जास्त कौतुक होत असून तो सिनेमाचा मोठा हायलाईट ठरला आहे. या चिकत्पटात अक्षय खन्नाची एंट्री एका गाण्यावर होते. या सीनचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. या चित्रपटात रणवीर सिंह भारतीय गुप्तहेर हमजाच्या भूमिकेत आहे. तो रेहमान डकैतच्या टोळीत घुसखोरी करतो. रणवीर आणि अक्षय खन्ना व्यतिरिक्त, सारा अर्जुन, राकेश बेदी, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रिलीज होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळूनही, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाने दमदार ओपनिंग नोंदवली आहे. Akshaye Khanna | हेही वाचा : “आज मी जिवंत आहे कारण….”; रेखाच्या शब्दांनी उपस्थितांची मनं जिंकली, सौदी अरेबियातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल