School Holiday : मोठी बातमी! सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी; KDMC चा मोठा निर्णय
School Holiday : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

School Holiday : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (School Holiday)
ठाणे जिल्ह्यासाठी ४ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार, ४ जुलै रोजी केडीएमसी हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (School Holiday)
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसह सर्व महाविद्यालये बंद राहणार आहेत. (School Holiday)
केडीएमसीने पालक आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ ते ३ जुलैदरम्यान ऑरेंज अलर्ट, ४ जुलै रोजी रेड अलर्ट आणि ५ जुलै रोजी पुन्हा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, काही भागांत पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (School Holiday)
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय राज्य मंडळ, CBSE, ICSE, CIE तसेच अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित सर्व शाळा व महाविद्यालयांना लागू राहणार आहे. (School Holiday)
याशिवाय, पुढील काही दिवस हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही केडीएमसी शिक्षण विभागाने दिले आहेत. (School Holiday)
Holi School Holiday: होळीनिमित्त शाळेला सुट्टी कधी? 2, 3 की 4 मार्च…. जाणून घ्या






