Women’s Asian Champions Trophy 2024 : भारतीय संघाची केली घोषणा; सलीमा टेटे अन् नवनीत कौरकडे मोठी जबाबदारी…

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 :– बिहारमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या राजगीर हॉकी स्टेडियम येथे 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून सलिमा टेटेकडे कर्णधारपदाची तर नवनीत कौरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी रांची येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मारा भारतीय संघाचा कामगिरी घसरली आहे. या स्पर्धेत भारतासमोर ऑलिम्पिक रौप्यविजेत्या चीन, जापान, कोरिया, मलेशिया व थायलंड या संघाचे मोठे आव्हान असणार आहे. 11 नोव्हेंबर पहिल्याच्या मलेशिया संघाचे आव्हान भारतासमोर असणार आहे.
🇮🇳 𝕊𝕢𝕦𝕒𝕕 𝔸𝕟𝕟𝕠𝕦𝕟𝕔𝕖𝕞𝕖𝕟𝕥 𝔸𝕝𝕖𝕣𝕥!🇮🇳
Presenting the Indian Women’s Hockey Team for the 𝐁𝐢𝐡𝐚𝐫 𝐖𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐀𝐬𝐢𝐚𝐧 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲 𝐑𝐚𝐣𝐠𝐢𝐫 𝟐𝟎𝟐𝟒! With a mix of experience, talent, and youthful energy, our players are ready to… pic.twitter.com/89ZgYwQP64
— Hockey India (@TheHockeyIndia) October 28, 2024
दरम्यान, साल 2023 च्या अंतिम सामन्यात भारताने जपानचा 4-0 ने पराभव केला होता आणि 2016 नंतर दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते. सलामीच्या लढतीत भारताचा सामना मलेशियाशी होईल, त्यानंतर 12 नोव्हेंबरला कोरिया, 14 नोव्हेंबरला थायलंड, 16 नोव्हेंबरला चीन आणि 17 नोव्हेंबरला जपानशी सामना होईल.
भारतीय संघ :
गोलरक्षक : सविता, बिचू देवी खारीबम.
बचावपटू : उदिता, ज्योती, वैष्णवी विठ्ठल फाळके, सुशीला चानू पुक्रंबम, इशिका चौधरी.
मिडफिल्डर : नेहा, सलीमा टेटे, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनीलिता टोप्पो, लालरेमसियामी.
फॉरवर्ड : नवनीत कौर, प्रीती दुबे, संगीता कुमारी, दीपिका, ब्युटी डुंगडुंग.





