#BiharWACT2024 | आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघावर बक्षीसांचा वर्षाव, बिहार सरकारनं केली मोठी घोषणा…

Women’s Asian Champions Trophy 2024 (India vs China, Final) : महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. या ऐतिहासिक कामगिरी बिहार सरकारने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रत्येक खेळाडूला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने अंतिम फेरीत ऑलिम्पिक 2024 रौप्यपदक विजेत्या चीनचा 1-0 असा पराभव केला. भारताकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने 31व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरव्दारे केला. तसेच स्ट्रायकर दीपिकाने स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करताना तब्बल 11 गोल करताना मालिकावीर हा ‘किताब’ही पटकावला आहे.
👏 Big recognition for excellence!
The Bihar Government has announced cash awards of ₹10 Lakhs each for the incredible players, ₹10 Lakhs for the chief coach, and ₹5 Lakhs for the dedicated support staff! A well-deserved appreciation for the hard work, determination, and… pic.twitter.com/8Xlnz9lDQO— Hockey India (@TheHockeyIndia) November 20, 2024
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, “संघाच्या प्रत्येक खेळाडूला स्पर्धेदरम्यान राजगीर हॉकी स्टेडियमवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 10 लाख रुपये दिले जातील.” मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफलाही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रसिद्धीपत्रकानुसार, “याशिवाय मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना 10 लाख रुपये तर उर्वरित सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील.”
स्पर्धेत भारत अंजिक्यच….
या सामन्यापूर्वी चीनचा संघ भारतीय संघापेक्षा हेड टू हेड आकडेवारीत खूप पुढे होता. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व राखले. भारतीयांनी या सामन्यात आपले सर्व सामने जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. फायनलमध्ये पोहोचेपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नव्हता. साखळी फेरीतील पाचही सामने जिंकून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर होती. भारतीय संघाने उपांत्य फेरीत जपानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने एकूण 26 गोल केले होते, तर त्यांच्याविरुद्ध फक्त 2 गोल झाले होते.





