Paris Olympics 2024 (Shooting,Trap) : पराभवासह राजेश्वरी आणि श्रेयसीचे आव्हान संपुष्टात

Paris Olympics 2024 (Shooting,Women’s Trap Qualification Round) : पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन पुरुष पात्रता फेरीत भारताच्या आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने सातव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, नेमबाजीतील अन्य प्रकारात बुधवारी भारताच्या हाती निराशा लागली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती भारतीय ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग आणि आशियाई क्रीडा 2023 च्या महिला संघाची रौप्यपदक विजेती राजेश्वरी कुमारी यांना महिला ट्रॅप स्पर्धेच्या पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे त्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकल्या नाहीत. यासह दोघींचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
Trap Women’s Qualification👇🏻
Rajeshwari Kumari finishes 22nd with a score of 113
Shreyasi Singh also ends her campaign in 23rd place with a total score of 113
Top 6 from this Qualification Round proceeded to the finals
Let’s #Cheer4India chants out loud, let’s support our… pic.twitter.com/N2Fa4PXiEU
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2024
राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग यांनी प्रत्येकी 113-113 गुण प्राप्त केले आणि त्या अनुक्रमे 22 व्या आणि 23 व्या स्थानावर राहिल्या. पृथ्वीराज तोंडाईमन मंगळवारी पुरुषांच्या ट्रॅप पात्रता फेरीत 21व्या स्थानावर राहिला होता. त्यामुळे तोही अंतिम फेरी गाठू शकला नव्हता.
Paris Olympics 2024 (Shooting) : कोल्हापूरकर स्वप्निल कुसळेची अंतिम फेरीत धडक…
दरम्यान, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि ईशा सिंग शुक्रवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुल स्पर्धेत भाग घेतील. शॉटगन स्कीट स्पर्धांमध्ये भारताच्या मोहिमेलाही त्याच दिवशी सुरुवात होईल.
श्रेयसी सिंग भाजपाच्या आमदार….
श्रेयसी या बिहारच्या जमुई विधानसभेतून भाजपच्या तिकीटावर आमदार आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत श्रेयसीने आरजेडीच्या विजय प्रकाश यांचा सुमारे 41 हजार मतांनी पराभव केला होता. श्रेयसी ही बिहारचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे, जे माजी खासदार होते. श्रेयसीची आई पुतुल सिंह या देखील बांका मतदारसंघातून खासदार राहिलेल्या आहेत.
श्रेयसी सिंगने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2010 मध्ये ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय त्याने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 2017 मध्ये डबल ट्रॅपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये श्रेयसी सिंग दुहेरी ट्रॅपमध्ये सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरली होती. तिने आशियाई खेळ 2014 मध्ये डबल ट्रॅप संघात कांस्यपदक जिंकले होते. 32 वर्षीय श्रेयसीला क्रीडा क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.





