हिना खानची अशनूर कौरसाठी खास पोस्ट; सलमानचेही मानले आभार

Hina Khan Post | ‘बिग बॉस १९’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान तान्या मित्तल आणि नीलम गिरीला अशनूर कौरच्या शरीराबद्दल वाईट कमेंट केल्याबद्दल सुनावतो. याचदरम्यान आता अभिनेत्री हिना खाननं अशनूरसाठी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून हिनाने टीकेला धीरानं सामोरे गेल्याबद्दल अशनूरचं कौतुक केलं तर, सलमानचे आभार मानले.
या पोस्टमध्ये हीना खान म्हणते, “मी या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ची वाट बघत होते आणि म्हणूनच मी अशनूरवरील शारीरिक आणि असंवेदनशील टीकेबद्दल माझा राग व्यक्त केला नव्हता. कारण मला माहित होतं की, या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानही तिच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया देईल. धन्यवाद सलमान, हा विषय तु संवेदनशीलतेने, संयमाने हाताळलास.”
पुढे हिनाअशनूरबद्दल म्हणते, “फक्त २१ वर्षांच्या एका मुलीच्या उंची, वजन व रूपावर पुन्हा पुन्हा टीव्हीवर तिचेच काही सहस्पर्धक टिप्पणी करत आहेत, ज्या वय आणि अनुभवानं तिच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. हे अत्यंत लाजिरवाणं आहे, पण अशनूरबद्दल मला खूप अभिमान वाटतो. तिनं हे सगळं इतक्या शांतपणे, समजुतीनं हाताळलं. ती हे प्रकरण वाढवू शकली असती, पण तिनं नाटक केलं नाही, खोटे अश्रू, सहानुभूती मिळवायचा प्रयत्न नाही आणि प्रसिद्धीसाठी त्याचा वापरही केला नाही. कारण, ती तशी नाही. हेच तिच्यावरील संस्कार आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे.”
View this post on Instagram
त्यानंतर हीना खान म्हणते, “आपलं रूप, शरीररचना व आरोग्य हे नेहमी आपल्या आयुष्याच्या निवडींवर अवलंबून नसतं. कधी कधी ते आपल्या Genes वरही असतं. हे मी स्वतः अनुभवलं आहे. विशेषतः स्त्रियांना हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सहन कराव्या लागतात. मूड स्विंग्स, थकवा, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणं किंवा कमी होणं, त्वचा कोरडी होणं, तसेच मधुमेह, थायरॉईड, स्थूलपणा आणि असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. आपण आपलं जेनेटिक्स बदलू शकत नाही आणि त्यामुळे त्याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागतात.”
“स्वतःचं शरीर आणि शरीराच्या समस्याांशी लढणं किती कठीण असतं हे मला माहीत आहे. ते आयुष्य बदलून टाकणारं आणि अनेकदा नैराश्य आणणारं असतं. जेव्हा ते Gene मध्येच असतं, तेव्हा त्याचा परिणाम काय होतो, हे मला विचारा. आपण सगळे चुका करतो. मीसुद्धा केल्या आहेत, पण जेव्हा तीच चूक पुन्हा पुन्हा केली जाते आणि त्याबद्दल पश्चात्तापही नसतो, तेव्हा ते फक्त एक सोईस्कर वर्तन असतं. ज्यांना हे मान्य नाही, त्यांना थोडी सहानुभूती लाभो आणि जगात सगळीकडे प्रेम असावं, असं मनापासून वाटतं,” असे म्हणत हिनाने तान्या आणि निलमच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करते.
नेमकं काय घडलं होतं?
‘बिग बॉस १९’मध्ये नुकत्याच झालेल्या एका भागात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरच्या वाढत्या वजनावर टीका केली होती. ज्यात तान्या आणि नीलम यांनी तिचा उल्लेख हत्ती व डायनोसॉर असा केला होता. तसेच आईसारखी दिसते, असंही म्हटलं होतं. Hina Khan Post |
हेही वाचा:
“पाकिस्तानच्या भूमिगत अणुचाचण्यांमुळे भूकंप” ; ट्रम्प यांचा मोठा दावा अन् जगाला सूचक इशारा





