Hina Khan Post : हिना खानची पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पोस्ट; म्हणाली…
Hina Khan Post : अमेरिका-इस्त्राईल आणि इराणच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री हिना खान हिची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे

Hina Khan Post : अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले करत आहेत. इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारतातही याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. सर्वसामान्यांपासून ते मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण यावर आपली मते मांडत आहे. Hina Khan Post

Hina Khan Posts
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान हिची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. हिनाने या पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले असून, त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले आहे.
ट्विटरवर पोस्ट शेअर करत हिना खानने दोन फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एक पंतप्रधान मोदींचा आहे. एका फोटोमध्ये, एक लहान मूल रस्त्यावर काठीच्या सहाय्याने टायर ढकलत असल्याचे दिसते. या फोटोंसोबत हिनाने लिहिले आहे की, “ज्यांना हे व्यवस्थित चालवताही येत नाही ते एवढा मोठा देश चालवणाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत. धाडस, शौर्य, विडंबना. जय हिंद.”
Jo ye bhi theek se nahi chala sakte
Woh uspe sawaal uthaa rahe hain jo Itna bada desh chala raha hai..
Audacity, Guts, Irony!
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/KpmctRStp6— Hina Khan (@eyehinakhan) March 2, 2026
हिना खानने या पोस्टद्वारे देशद्रोहींना उत्तर दिले आहे. तिने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जे लोक छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देखील नीट पार पाडू शकत नाहीत ते देशाच्या कार्यभार सांभाळणाऱ्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्या हिना खानच्या पोस्टवर काही नेटिझन्स टीका करत आहेत. तर, काही लोक हिना खानच्या पोस्टला समर्थनही देत आहेत.Hina Khan Post
हेही वाचा:





