हीना खानने गमावला आणखीन एक सिनेमा

हीना खानच्या बाबतीत बऱ्याच दिवसांत एखादी चांगली बातमी ऐकायला मिळालेली नाही. बिचारीच्या वाट्याला चांगले रोल येतच नाहीत. अशातच आणखी एक वाईट बातमी तिने शेअर केली आहे. काश्मिरी मुलीचा एक रोल तिच्या वाट्याला आला होता.
मात्र, हा रोलदेखील तिला गमवावा लागला आहे. काश्मिरी मुली खूपच उजळ रंगाच्या असतात. मात्र, हीना खान खूप उजळ नाही, म्हणून तिला हा रोल मिळू शकला नाही. मात्र, हीना स्वतः काश्मिरी आहे आणि ती काश्मिरी भाषा उत्तम बोलू शकते. म्हणून इतर कोणाऐवजी ती या रोलला योग्य न्याय देऊ शकली असती, असा तिचा स्वतःचा दावा आहे.
काही वेळा एखादी कथा आवडली नसते किंवा एखादा रोल करावा असेही वाटले नसते. कदाचित एखाद्या रोलसाठी मी योग्य ठरले नसते तरी काही हरकत नव्हती. मात्र, काश्मिरी मुलीला काश्मिरी वाटत नसल्याबद्दल नाकारणे योग्य नाही, असे हीना खानने म्हटले आहे. तिला कोणत्या सिनेमासाठी हा नकार मिळाला आहे, हे मात्र तिने सांगितले नाही. मात्र, कोणत्या सिनेमातून वगळले हे तिने सांगितले नाही.





