Ashnoor Kaur : मुंबईच्या पावसाचा अशनूर कौरला फटका; अलिशान घरात शिरले पाणी
Ashnoor Kaur : अशनूरचा संपूर्ण स्टाफ घर सावरण्यात आणि पाणी बाहेर काढण्यात व्यस्त

Ashnoor Kaur : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने शहरातील जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झालं आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींना देखील बसल्याचं पाहायला मिळतंय.
टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर (Ashnoor Kaur) हिला देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. अशनूरच्या घरात पाणी शिरले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पावसाचे पाणी तिच्या बाल्कनीतून थेट लिव्हिंग रूमपर्यंत पोहोचले आहे. या कठीण काळात अशनूरचा संपूर्ण स्टाफ घर सावरण्यात आणि पाणी बाहेर काढण्यात व्यस्त आहे. (Ashnoor Kaur)
Ketan Aggarwal Case : कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर
अचानक आलेल्या पाण्यामुळे घरातील मौल्यवान सामान खराब होण्यापासून वाचवण्यासाठी लगेचच धावपळ सुरू करावी लागली. दरम्यान, अशनुर कौरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच, चाहत्यांनी चिंता व्यक्त करत तिच्यासह कुटूंबाना काळजी घेण्याचे आवाहन केले. (Ashnoor Kaur)
जरी अशनूरने व्हिडिओमध्ये कोणत्याही मोठ्या नुकसानीचा किंवा अपघाताचा उल्लेख केला नसला, तरी पाणी पाहून हे स्पष्ट होत आहे की तिला व तिच्या कुटूंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत दरवर्षी मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचते, ज्यामुळे रस्त्यांवर वाहनांचा वेग मंदावतो आणि लोकल ट्रेन्सवरही परिणाम होतो. अशनूरच्या या व्हिडिओने पुन्हा एकदा मुंबईच्या पावसाचे भयानक रूप सर्वांसमोर आणले आहे. (Ashnoor Kaur)
अलिकडेच, अशनूर कौर नुकतीच ‘बिग बॉस १९’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. २००९ साली ‘झांसी की रानी’ या मालिकेतून अशनूर कौरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेल्या प्राची नावाच्या पात्रामुळे आजही ती चाहत्यांच्या लक्षात आहे. याशिवाय अशनूर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कोई लौट के आया है’ या मालिकेतही पाहायला मिळाली. (Ashnoor Kaur)
हेही वाचा:







