Bigg Boss 19 | ‘बिग बॉस 19’ शोमध्ये अनेक स्पर्धकांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे विधान केले आहे. यातच आता भोजपुरी अभिनेत्री निलम गिरी देखील तिच्या खासगी आयुष्यातील विधानामुळे चर्चेत आली आहे. निलम हिने पहिल्यांदा तिच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं आहे. तान्याशी बोलताना निलमने तिच्या आयुष्यातील भावनिक क्षणांची आठवण केली, जेव्हा तान्याने निलमला तिच्या दिवाळी साजरी करण्याबद्दल विचारलं. तेव्हा निलम तिच्या कुटुंबाबद्दल बोलत असताना वैवाहिक आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. वैवाहिक आयुष्याबद्दल निलम म्हणाली, ‘त्या पुरुषासोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी आनंद अनुभवलाच नाही. मी माझ्या इच्छेने वेगळी नाही, ते दिवस फार कठीण होते. त्या पुरुषासोबत लग्न माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आज याबद्दल विचार केल्यानंतर मला दुःख होतं.’ याआधी, मालतीसोबत बोलताना नीलमने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं होतं. “लहानपणी वडील घर चालवण्यासाठी लाकूड तोडायचे. दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून त्यांनी खूप कष्ट केले,” असं नीलमनं भावुक होतं सांगितलं होतं. Bigg Boss 19 | फरहानावर निशाणा दरम्यान, एका टास्कमध्ये सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरून पत्रे आली. घरातील सर्व स्पर्धकांनी पत्र देण्यासाठी स्वतःच्या कॅप्टेंसी पदाची दावेदारी सोडली. तर फरहाना हिच्याकडे निलम हिचं पत्र होतं. कॅप्टेंसीसाठी तिने निलमच्या घरातून आलेलं पत्र फाडलं. अशात सर्व स्पर्धकांना फरहानावर निशाणा साधला. फरहाना हिने पत्र फाडल्यानंतर नीलम भावूक झाली. हेही वाचा: राष्ट्रवादीत बेशिस्तपणा? राजन पाटलांनी सांगितलं अजित पवारांची साथ सोडण्याचं नेमकं कारण; भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर मिश्किल विधान म्हणाले…