Accident News : विचित्र अपघात..! एसटी, कार आणि दुचाकीच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : सोमवारी सकाळी एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अत्यंत विचित्र तिहेरी अपघातात तब्बल ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे मार्गावर सोमवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर-धुळे रस्त्यावरील मंगरूळ गावाजवळ हॉटेल वृंदावन परिसरात सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. एसटी बस, कार आणि दुचाकी धुळ्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या गुजरात पासिंग कारने नियंत्रण गमावून या वाहनांना जोरदार धडक दिली. (Accident News)
धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Accident News)
अपघातानंतर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. कारमध्ये अडकलेल्या एका चिमुकल्यासह इतर जखमींना स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident News)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह मदतकार्य हाती घेतले. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Accident News)





