Best Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात; चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने 3-4 गाड्यांना धडक
Best Bus Accident : बेस्ट बसमधील 4 प्रवासी जखमी

Best Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात झाला आहे. दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ असलेल्या कोतवाल उद्यानाजवळ ही घटना घडली. बेस्ट बस आणि टॅक्सी कारची धडक झाली. त्यानंतर बसची एका दुचाकीलाही धडक बसली. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत.
चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात तीन ते चार गाड्यांना बेस्ट बसने धडक दिली. बेस्ट बस धारावीकडून-दादरकडे येत होती.सकाळी ९.४५ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बेस्ट बस कार आणि एका दुचाकीला जाऊन धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, टॅक्सी कार उलटली. त्याचबरोबर दुचाकी बाजूला जाऊन पडली. दादर टीटी आणि प्लाझा सिनेमाकडून कोतवाल गार्डनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. (Best Bus Accident)

Best Bus Accident : मुंबईत बेस्ट बसचा अपघात; चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने 3-4 गाड्यांना धडक
बेस्ट बसमधील 4 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बेस्ट बसचा ज्या ठिकाणी अपघात झाला, तो वर्दळीचा भाग आहे. दादरच्या प्लाझा टॉकीज आणि आसपासच्या परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी असते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. तर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवण्यात आली. मात्र वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. (Best Bus Accident)
हेही वाचा:





