श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काल रात्रभर झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा स्वयंभू कमांडर ठार झाला तर तीन सैनिक आणि एक नागरिक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठार झालेल्या कमांडरचे नाव निसार खांडे असे असून त्याच्याकडे एक एके 47 राफल आणि काही दारूगोळा सापडला आहे. तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशन आज दुपारीही सुरूच होते.अनंतनागच्या ऋषीपोरा भागात शुक्रवारी संध्याकाळी ही चकमक सुरू झाली.
या चकमकीत तीन सैनिक आणि एक नागरिकही जखमी झाला आहे त्यांना श्रीनगरच्या बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रुषीपोरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तचर सूत्रांकडून मिळाली होती.