राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान

भुवनेश्वर – ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या १८ व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्यच नाही तर अनेक शतकांच्या सभ्यतेचा पाया असलेली मूल्ये आणि नैतिकता देखील आपल्यासोबत नेली आहे.तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, कला किंवा उद्योजकता यापैकी कोणतेही क्षेत्र असो, भारतीय समुदायाने यामध्ये आपला असा ठसा उमटवला आहे की जग त्यांची दखल घेते आणि त्यांचा बहुमान करते, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
President Droupadi Murmu graced the valedictory session of the 18th Pravasi Bharatiya Divas Convention and presented Pravasi Bharatiya Samman Awards at Bhubaneswar, Odisha. The President said that the Pravasi Bharatiya Divas has, over the years, become more than just an event; it… pic.twitter.com/ME1GDS43Sl
— President of India (@rashtrapatibhvn) January 10, 2025
प्रवासी भारतीय दिवस हा केवळ एक कार्यक्रम न राहता त्यापलीकडे गेला आहे हे पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. सध्या आपला देश 2047 पर्यंत विकसित भारतच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हे एक राष्ट्रीय अभियान असून यामध्ये परदेशात राहणाऱ्यांसह प्रत्येक भारतीयाचा सक्रीय आणि उत्साही सहभाग आवश्यक आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. परदेशस्थ भारतीय समुदाय या दृष्टीकोनाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या जागतिक उपस्थितीने त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन प्रदान केला आहे आणि त्यांच्या कामगिरीमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये त्यांना लक्षणीय योगदान देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या वसुधैव कुटुंबकम हा दृष्टीकोन केवळ आपल्या गरजांची पूर्तता करण्याविषयीच नाही तर जागतिक कल्याणातही योगदान देणारी परिसंस्था निर्माण करण्याबद्दलचा आहे. आम्ही आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्याय आणि पर्यावरणीय व्यवस्थापन यांचे संतुलन साधणारे आणि भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणारे राष्ट्र बनू इच्छित आहोत,असे त्यांनी सांगितले. या स्वप्नाच्या पूर्ततेत भारतीय समुदायाची भूमिका महत्त्वाची असेल असे त्या म्हणाल्या.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षांचा सन्मान…
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू आणि इतर २६ जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना सार्वजनिक व्यवहार श्रेणीत हा पुरस्कार मिळाला. त्यांच्याशिवाय अजय राणे (ऑस्ट्रेलिया, समुदाय सेवा), मारियालेना जोन फर्नांडिस (ऑस्ट्रिया, शिक्षण), स्वामी संयुक्तानंद (फिजी, समुदाय सेवा), सरस्वती विद्या निकेतन (गयाना, समुदाय सेवा), लेख राज जुनेजा (जपान, विज्ञान आणि तंत्रज्ञान) यांचा समावेश होता. प्रेम कुमार (किर्गिझ प्रजासत्ताक, वैद्यकीय विज्ञान) आणि सौकथवी चौधरी (लाओस, व्यवसाय) यांनाही प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले.





