यानंतर पुन्हा एकदा हेनिलचे वादळ आले. त्याने सेट झालेला फलंदाज अर्जुन महेश आणि अमेरिकेचा कर्णधार उत्कर्ष श्रीवास्तव (०) यांना लागोपाठ बाद करत अमेरिकेची अवस्था ४ बाद ३५ अशी दयनीय केली. खिलान पटेलने अमोघ अरेपल्लीला (३) बाद करून अमेरिकेचा पाचवा गडी टिपला. यानंतर काही वेळातच अमेरिकेचा संघ १०७ धावांत गारद झाला. ज्यामध्ये हेनिल पटेलने सर्वाधिक पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
\nहेही वाचा – Meg Lanning Record : मेग लॅनिंगचा ऐतिहासिक पराक्रम! डब्ल्यूपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली तिसरी फलंदाज
\nकोण आहे हेनिल पटेल?
\n\n\nInnings Break!
\nHenil Patel’s brilliant figures of 5️⃣/1️⃣6️⃣ help India U19 restrict USA U19 to 107 👏
\nOver to our batters 🙌
\nScorecard ▶️ https://t.co/AMFM5Bk4oI#U19WorldCup pic.twitter.com/Ro8Fy9Pkly
\n— BCCI (@BCCI) January 15, 2026
\nहेनिल पटेल हा गुजरातचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची कला आणि अचूक ‘लाईन-लेंथ’ ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. यापूर्वी इंग्लंडविरुद्धची युवा कसोटी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे.