India U19 squad : अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीकडे सूत्रे, पाहा संपूर्ण संघ

India U19 squad Announce for World Cup 2026 : बीसीसीआयने २०२६ मध्ये होणाऱ्या ‘आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषका’साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी युवा फलंदाज आयुष म्हात्रे याच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विश्वचषकासोबतच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही संघ जाहीर केला असून, तेथे नेतृत्वात बदल पाहायला मिळणार आहे.
वैभव सूर्यवंशीकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्याची कमान –
नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा यांना मनगटाची दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हे दोन्ही प्रमुख खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीकडे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. जखमी आयुष आणि विहान उपचारासाठी बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये दाखल होतील आणि थेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी संघात सामील होतील.
विश्वचषकाचे वेळापत्रक आणि भारताचे आव्हान –
🚨 News 🚨
India’s U19 squad for South Africa tour and ICC Men’s U19 World Cup announced.
Details▶️https://t.co/z21VRlpvjg#U19WorldCup pic.twitter.com/bL8pkT5Ca2
— BCCI (@BCCI) December 27, 2025
आगामी अंडर-१९ विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार असून त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. पाच वेळचा विजेता भारत (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) अ गटात असून भारतासोबत न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.
हेही वाचा – Bangladesh Crisis : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद भारतात; केकेआरसह आयपीएलवर बहिष्काराचा इशारा
- ५ जानेवारी: भारत विरुद्ध अमेरिका (पहिली लढत)
- १७ जानेवारी: भारत विरुद्ध बांगलादेश
- २४ जानेवारी: भारत विरुद्ध न्यूझीलंड
हे सर्व सामने बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर खेळवले जातील.
वैभव सूर्यवंशी: भारतीय संघाचा ‘एक्स फॅक्टर’ –
यावेळेस सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर असतील. वैभवने २०२४-२५ च्या हंगामात ७ स्फोटक शतके झळकावून खळबळ माजवली आहे. आयपीएल २०२५ मधील शतकानंतर त्याने युथ टेस्ट, वनडे, इंडिया-ए, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे आणि आशिया चषकातही शतकी खेळी केल्या आहेत.
U19 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अॅरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन.
हेही वाचा – Year Ender 2025 : गुकेश-दिव्यापासून शीतल-सुमितपर्यंत: २०२५ मध्ये भारताच्या ‘या’ खेळाडूंची जागतिक धूम!
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा अंडर 19 संघ:
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद अनन, हेनिल पटेल, डी. दिपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल, आणि राहुल कुमार





