Pune : गांजा बाळगणाऱ्याला पोलीस कोठड
Updated On:

पुणे – गांजा बाळगणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी 17 हजार 800 रुपये किमतीचा 712 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
केशव त्र्यंबक काळे (वय 21) असे त्याचे नाव आहे. तो एका व्यक्तीकडून हा गांजा खरेदी केल्याचे सांगत आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रसाद जंगीलवाड यांनी याबाबत फिर्याद दिली. काळे याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी विजयसिंह जाधव यांनी केली.





