“हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..” पुणे पोलिसांच्याही मुखी विठुरायाचा गजर

पुणे – आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे.
यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर पुणे पोलिसांनी ट्विट करत सर्वांना वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
!! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!
“आषाढी वारी” च्या हार्दिक शुभेच्छा !
माऊली, ह्या वर्षी ही पायी आषाढी वारीवर काही निर्बंध आले आहेत. पण मनातील भक्तीची भावना मात्र तशीच कायम राहील.” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,
कोरोना रुपी संकटातून मानव मुक्त व्हावा ” #PUNE pic.twitter.com/FIK9mw8Pj0— CP Pune City (@CPPuneCity) July 2, 2021
“आषाढी वारी” च्या हार्दिक शुभेच्छा ! माऊली, ह्या वर्षी ही पायी आषाढी वारीवर काही निर्बंध आले आहेत. पण मनातील भक्तीची भावना मात्र तशीच कायम राहील. ” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, कोरोना रुपी संकटातून मानव मुक्त व्हावा..” या आशयाचे ट्विट पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.




