पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा हाहाकार; पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस

पुणे – जिल्ह्यातील घाट परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसाने दरडी पडणे, रस्ता खचणे, यांसह पुलावरून पाणी वाहू लागल्याने मार्ग बंद झाले. डोंगरमाथ्यावरून फेसाळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले असून, गेल्या २४ तासांत ताम्हिणी आणि शिरगाव घाट परिसरात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे.
पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या ताम्हिणी घाट परिसरात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर शिरगाव येथे ३६० मिमी पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पुणे वेधशाळेने पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे प्रशासनाकडून घाटमाथा परिसरात बंदोबस्त लावला होता, तसेच मावळातील कुंडमळा येथे झालेल्या घटनेनंतर घाटक्षेत्रात पर्यटनास बंदी घातली आहे.
मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे घाट परिसरात राहणाऱ्या गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. रस्ते खचले, पुलावरून पाणी जात असल्याने रस्ते बंद होऊन गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले.
ताम्हिणी ३७०, शिरगाव ३६०, दावडी २५०, डुंगरवाडी २००, कोयना १५८, लोणावळा २०५, अंबवणे १८४, वळवण १५८, भिरा १५२, शिरोटा १०६, खंद १०१, खोपोली ८४,





