Gloves Controversy : हार्दिक पंड्यासाठी नियम वेगळे आहेत का? ‘त्या’ एका कृतीने पंचांची पोलखोल; चाहते संतप्त, नेमकं प्रकरण काय?
Gloves Controversy : मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि पंचांच्या भूमिकेवर आता क्रिकेट वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Hardik Pandya Gloves Controversy : वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवला खरा, पण मैदानावर घडलेल्या एका अजब प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि पंचांच्या भूमिकेवर आता क्रिकेट वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आरसीबीने दिलेल्या २४१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने ओव्हरच्या मध्यंतरातच आपले ग्लव्स (हातमोजे) बदलले. नियमांनुसार, कोणताही फलंदाज ओव्हर संपल्यानंतर किंवा ठराविक ब्रेक दरम्यानच आपले साहित्य बदलू शकतो. ओव्हर सुरू असताना साहित्य बदलण्याची परवानगी केवळ गंभीर दुखापत किंवा साहित्य खराब झाल्यासच दिली जाते. मात्र, हार्दिकला पंचांनी दिलेली ही सूट वादाचे कारण ठरली आहे.
ट्रिस्टन स्टब्सचा दाखला अन् दुजाभाव – (Gloves Controversy)
Diffrent rule for different player
This is not fair.Controversy brews as Hardik Pandya changes gloves mid-game,
while Tristan Stubbs wasn’t given the same chance during CSKvDC
(DC needed 32 runs in the last two overs)#RCBvsMI । #MIvsRCB । #IPL2026 । #TATAIPL ।… pic.twitter.com/GqNmLGsiiQ
— Infinite Info (@infiniteInfos) April 12, 2026
हा वाद चिघळण्याचे मुख्य कारण म्हणजे अवघ्या एक दिवसापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात घडलेली घटना. त्या सामन्यात दिल्लीच्या ट्रिस्टन स्टब्सने प्रचंड घाम येत असल्याने ओव्हरच्या मध्यात ग्लव्स बदलण्याची मागणी केली होती, जी पंचांनी फेटाळून लावली होती. मग तोच नियम हार्दिक पंड्यासाठी का बदलला? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.
आयसीसीचा नियम काय?
पंचांच्या या निर्णयामुळे आरसीबीच्या गोटात आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. आयसीसी (ICC) आणि आयपीएलच्या नियमावलीत घामामुळे ग्लव्स बदलण्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मात्र, पंचांना त्यांच्या स्वेच्छाधिकारात निर्णय घेण्याची मुभा असते. याच अधिकाराचा वापर दोन वेगवेगळ्या सामन्यांत दोन वेगळ्या पद्धतींनी केल्यामुळे अंपायरिंगच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा – Hardik Pandya Warn : सलग तिसऱ्या पराभवानंतर संतप्त हार्दिकने मुंबईच्या खेळाडूंना दिला इशारा; म्हणाला, ‘तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय…’
या सामन्यात आरसीबीने २४० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरादाखल मुंबई २२२ धावांपर्यंतच मजल मारू शकली. रोहित शर्मा जखमी होऊन बाहेर जाणे आणि हार्दिकचा हा ग्लव्स वाद सध्या आयपीएल २०२६ मधील सर्वात चर्चेचे विषय ठरले आहेत.





