Jasprit Bumrah Batting : विराट-श्रेयसचं अर्धशतक पण सर्वत्र बुमराहची चर्चा! साकिब महमूदच्या एकाच षटकात कुटल्या १८ धावा, पाहा VIDEO
Jasprit Bumrah Batting : बुमराहने १५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने नाबाद २० धावा करत वनडे क्रिकेटमधील आपला सर्वोत्तम स्कोअर नोंदवला.

Jasprit Bumrah Batting vs Saqib Mahmood India vs England 2nd ODI Cardiff : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजीचा एक मोठा कोलमडलेला डाव पाहायला मिळाला. कार्डिफ येथे झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही टीम इंडिया अवघ्या ४४ षटकांत २३३ धावांवर ऑलआऊट झाली. भारताची मधली फळी पत्त्यांसारखी विखुरली असली, तरी शेवटच्या षटकांमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण मैदानात खळबळ उडवून दिली. बुमराहने १५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने नाबाद २० धावा करत वनडे क्रिकेटमधील आपला सर्वोत्तम स्कोअर नोंदवला.
बुमराहने साकिब महमूदला धो-धो धुतले!
भारताच्या डावातील ४३ वे षटक टाकायला आलेल्या इंग्लंडच्या साकिब महमूदवर बुमराहने अक्षरशः हल्ला चढवला. या षटकात बुमराहने ३ नेत्रदीपक चौकार आणि शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार खेचत एकूण १८ धावा वसूल केल्या. बुमराहची ही फलंदाजी पाहून इंग्लिश खेळाडूंसह प्रेक्षकही अवाक् झाले. बुमराहने यापूर्वी २०२२ च्या एजबेस्टन कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात तब्बल ३५ धावा (बॅटने २९ धावा) कुटून कसोटी इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरवण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्याचीच पुनरावृत्ती त्याने आज कार्डिफमध्ये केली.
India’s Jasprit Bumrah ended with his highest #ODI score of 20* off 13 balls (3 fours and a six).
He then got Ben Duckett off the first ball of England’s innings, an edge to keeper Ishan Kishan.#Cricket #ENGvsIND #MI
VIDEO: pic.twitter.com/LPeeRVo7q3
— The CricHub (@thecrichub_live) July 16, 2026
३० व्या षटकानंतर टीम इंडियाची दैना; ५५ धावांत पडले ७ विकेट्स –
या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली होती. शुबमन गिलने ३१ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर विराट कोहली (६५ धावा) आणि श्रेयस अय्यर (६६ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले होते. भारत ३०० चा टप्पा सहज ओलांडेल असे वाटत असतानाच, ३० व्या षटकात विराट बाद झाला आणि संपूर्ण सामना फिरला.
फ्रंटफुटवर असलेला भारतीय संघ अचानक बॅकफुटवर गेला. भारताने अवघ्या ५५ धावांच्या अंतरात आपले शेवटचे ७ गडी गमावले आणि संपूर्ण संघ ४४ षटकांतच तंबूत परतला.





