Hardik Pandya Warn : सलग तिसऱ्या पराभवानंतर संतप्त हार्दिकने मुंबईच्या खेळाडूंना दिला इशारा; म्हणाला, ‘तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय…’
Hardik Pandya Warn : मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या खेळाडूंनी कडक इशारा दिला आहे.

Hardik Pandya Dressing Room Speech MI vs RCB : आयपीएल २०२६ (IPL2026) च्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सला (MI) त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर आरसीबीने (RCB) पराभवाची धूळ चारली. हंगामातील या सलग तिसऱ्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. ड्रेसिंग रूममधील त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून, त्याने खेळाडूंना थेट शब्दांत तंबी दिली आहे. Hardik Pandya Warn
मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम आतापर्यंत अत्यंत खडतर राहिला आहे. ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने कर्णधार हार्दिक पंड्या नाराज आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित करताना हार्दिकने स्पष्टपणे सांगितले की, “आता खेळाडूंनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पराभव नेहमीच जड असतो, पण आपण त्यातून शिकले पाहिजे. एकतर आपण जिंकतो किंवा शिकतो, पराभव ही गोष्ट नसते,” असे म्हणत त्याने संघाचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या आवाजात गांभीर्य स्पष्टपणे जाणवत होते. Hardik Pandya Warn
सँटनरचे कौतुक आणि खेळाडूंना ‘दोन पर्याय’ – Hardik Pandya Warn
“𝘓𝘦𝘵’𝘴 𝘭𝘦𝘢𝘳𝘯 𝘧𝘳𝘰𝘮 𝘰𝘶𝘳 𝘮𝘪𝘴𝘵𝘢𝘬𝘦𝘴” – Captain HP’s message to the team! 💙 pic.twitter.com/UAJ36N0ceq
— Mumbai Indians (@mipaltan) April 13, 2026
यावेळी हार्दिकने मिचेल सँटनरच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. सँटनरला ड्रेसिंग रूममध्ये ‘मेडल’ देताना हार्दिक म्हणाला, “सध्याचा काळ गोलंदाजांसाठी कठीण आहे, पण सँटनरने दाखवून दिले की सुरुवातीला धावा खाल्ल्या तरी पुनरागमन कसे करावे.” त्यानंतर त्याने सर्व खेळाडूंना उद्देशून दोन पर्याय दिले. “आता तुमच्याकडे दोनच मार्ग आहेत. पहिला म्हणजे आपल्या रूममध्ये जाऊन कुठे चूक झाली याचा विचार करा. आपण हॉटेलवर जाऊन एकत्र जेवण करू आणि क्रिकेटवर चर्चा करून यातून मार्ग काढू,” असे हार्दिकने बजावून सांगितले.
“आम्ही खूप धावा दिल्या अन् विकेट्सही गमावल्या” –
सामन्यानंतर झालेल्या सादरीकरणातही हार्दिकने पराभवाचे मुख्य कारण सांगितले. “आम्ही फलंदाजी करताना खूप लवकर विकेट्स गमावल्या आणि गोलंदाजी करताना खूप जास्त धावा दिल्या. गेल्या काही सामन्यांपासून आम्ही सामन्यावर पकड मिळवण्याऐवजी केवळ पिछाडी भरून काढण्यात व्यस्त आहोत. आम्हाला गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. हार्दिकच्या या ‘सिरिअस’ भाषणाने आता मुंबईच्या ताफ्यात खळबळ उडाली आहे. Hardik Pandya Warn





