Hardik Pandya Gift : हार्दिक पंड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्माला गिफ्ट केली अलिशान मर्सिडीज कार, किंमत ऐकून लावाल डोक्याला हाथ
Hardik Pandya Gift : हार्दिक पंड्याने गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला एक अत्यंत महागडे आणि लक्झरी गिफ्ट दिले आहे.

Hardik Pandya Gift Mercedes Car Mahika Sharma : टीम इंडियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या आपल्या आलिशान जीवनशैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर हार्दिकने आपल्या वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या आनंदाची भर घातली असून, त्याने आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला एक अत्यंत महागडे आणि लक्झरी गिफ्ट दिले आहे.
आलिशान कारची किती आहे किंमत?
मैदानावर आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारणारा हार्दिक पंड्या खऱ्या आयुष्यातही किंगसाईज आयुष्य जगण्यासाठी ओळखला जातो. नुकतेच हार्दिकने माहिका शर्माला भारताची पहिली मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास (Mercedes-Benz V-Class) कार भेट दिली आहे. या आलिशान गाडीची किंमत सुमारे १.७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कार तिच्या प्रीमियम फीचर्स आणि लक्झरी कंफर्टसाठी ओळखली जाते.
फेरारीनंतर आता मर्सिडीजचा जलवा!
Hardik Pandya gifted India’s first Mercedes-Benz V-Class to his girlfriend Mahieka sharma today, and its price is around ₹1.7 crore.🫡 pic.twitter.com/JXdn6dD5Jk
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 29, 2026
टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिकने स्वतःसाठी १२ कोटींची ‘फेरारी’ खरेदी केली होती, ज्यामध्ये तो माहिकासोबत फिरताना दिसला होता. हार्दिकने आपल्या मुलालाही एक महागडी कार भेट दिली होती. त्याच्या कार कलेक्शनमध्ये आधीच रोल्स-रॉयस फँटम, लॅम्बोर्गिनी हुराकॅन ईव्हीओ, रेंज रोवर आणि ऑडी A6 सारख्या अनेक महागड्या गाड्यांचा ताफा आहे.
वर्ल्ड कप विजयाचा ‘लेडी लक’?
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये हार्दिकने ९ सामन्यांत २१७ धावा आणि ९ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या विजयानंतर हार्दिकने माहिका शर्माचे जाहीर कौतुक केले होते. “माहिका आयुष्यात आल्यापासून सर्वकाही चांगले घडत आहे,” असे भावनिक विधान त्याने केले होते. सध्या हार्दिक आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यात व्यस्त असून, या नवीन लक्झरी कारच्या गिफ्टमुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे.





