Hardik Pandya New Car : हार्दिकने खरेदी तब्बल इतक्या कोटींची लक्झरी कार!गर्लफ्रेंड माहिकासोबत नव्या सुपरकारमधून रपेट; पाहा VIDEO
Hardik Pandya New Car : विश्वविजेता बनल्यानंतर हार्दिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत एका नव्या कोऱ्या अलिशान कारमध्ये स्पॉट झाला आहे.

Hardik Pandya New Car Ferrari 12Cilindri video viral : भारतीय क्रिकेटचा ‘पोस्टर बॉय’ हार्दिक पंड्या त्याच्या महागड्या आवडीनिवडींसाठी ओळखला जातो. विश्वविजेता बनल्यानंतर हार्दिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची कथित गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत एका नव्या कोऱ्या अलिशान कारमध्ये स्पॉट झाला आहे. हार्दिकने खरेदी केलेली ही कार त्याच्या गॅरेजमधील आतापर्यंतची सर्वात महागडी कार ठरली आहे.
Ferrari 12Cilindri: ताकद आणि वेगाचा संगम –
हार्दिकने इटालियन बनावटीची ‘Ferrari 12Cilindri’ ही सुपरकार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल १२ कोटी रुपये इतकी आहे. ही कार नॅचरली अस्पिरेटेड V12 इंजिनने सुसज्ज असून ती ८०० हून अधिक हॉर्सपॉवर निर्माण करते. ताशी ३४० किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या कारचे सौंदर्य आणि परफॉर्मन्स पाहून चाहते थक्क झाले आहेत.
महागड्या गाड्यांची ‘पंड्या’ फॅक्टरी –
Hardik Pandya has bought a new Ferrari 12Cilindri, which costs around ₹12 crore In which he is driving around with his girlfriend today. 🫡🔥 pic.twitter.com/nlRW4J5NqZ
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 14, 2026
काही दिवसांपूर्वीच हार्दिकने आपला मुलगा अगस्त्य आणि पूर्वाश्रमीची पत्नी नताशा हिला ४ कोटींची कार भेट दिली होती. त्यानंतर आता त्याने स्वतःसाठी ही १२ कोटींची Ferrari खरेदी केली आहे. हार्दिकच्या गॅरेजमध्ये आधीच अनेक आलिशान गाड्यांचा भरणा आहे:
रोल्स-रॉइस फॅन्टम: ९.५ कोटी रुपये (बाजारभावानुसार)
- लॅम्बोर्गिनी उरुस SE: ३.५४ कोटी रुपये
- ऑडी A6: ७० लाख ते १ कोटी रुपये
- रेंज रोव्हर व्होग: ४.४ कोटी रुपये
- मर्सिडीज-बेन्झ G-वॅगन: ३ कोटी रुपये
मैदानावरील अष्टपैलू कामगिरीनंतर हार्दिक आता रस्त्यावरही आपल्या या ‘लाल परी’सह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.





