Yash Dayal Wedding : RCB चा गोलंदाज यश दयालने गुपचूप उरकलं लग्न! गंभीर आरोपांदरम्यान कोणाशी बांधली लग्नगाठ? जाणून घ्या
Yash Dayal Wedding : यश दयाल याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप असताना, त्याने अत्यंत गोपनीय पद्धतीने लग्न उरकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Dayal Secret Wedding Shweta Pundir : आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी आरसीबीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. संघाचा स्टार गोलंदाज यश दयाल याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप असताना, त्याने अत्यंत गोपनीय पद्धतीने लग्न उरकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, यश दयालने ४ फेब्रुवारी रोजी नोएडा येथे श्वेता पुंडीर हिच्याशी विवाह केला. श्वेता एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर असून ती क्रिकेटशी संबंधित व्हिडीओ बनवते.
अत्यंत गोपनीय विवाह सोहळा –
यश दयालने आपल्या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे, एकाही क्रिकेटपटूला किंवा त्याच्या जवळच्या मित्रांनाही या लग्नाचे निमंत्रण नव्हते. श्वेता पुंडीरने नुकतीच यशसोबतची एक रील सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या लग्नाचा उलगडा झाला.
🚨 YASH DAYAL SECRETLY MARRIED SHWETA PUNDIR! 😱
Shweta Pundir is a social media content creator. The couple tied the knot on February 4 in a private ceremony, and their marriage remained completely under wraps until now.#YashDayal #RCB #Shwetapundir pic.twitter.com/HLzKdfrEBT
— Faruk🐦 (@uf2151593) March 15, 2026
गंभीर गुन्हेगारी आरोप आणि कायदेशीर लढाई –
Cricketer Yash Dayal married content creator Shweta Pundir. It was an intimate ceremony in Noida, Uttar Pradesh. The event was attended by immediate family and a few friends. No cricketer was at the wedding.#yashdayal #ShwetaPundir #YashDayalMarried pic.twitter.com/B6UfWWtwFB
— Game Changers (@Game_Changerrs) March 15, 2026
यश दयाल सध्या मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी आरसीबीने विजेतेपद पटकावल्यानंतर काही दिवसांतच एका महिलेने यशवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जयपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला, ज्यामुळे त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) अंतर्गत कारवाई सुरू आहे. डिसेंबर २०२५ मध्ये त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता, मात्र जानेवारी २०२६ मध्ये न्यायालयाने काही अटींसह अटकेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
हेही वाचा – Indian Wells Final 2026 : अल्काराझचा विजयी रथ मेदवेदेवने रोखला! जागतिक नंबर १ खेळाडूचा धुव्वा उडवत गाठली फायनल
आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार स्थान?
गंभीर आरोप असूनही आरसीबीने त्याला रिटेन केल्यामुळे फ्रेंचायझीवर टीका झाली होती. मात्र, अद्याप यश दयाल सराव सत्रासाठी संघात सामील झालेला नाही. कायदेशीर पेच आणि वैयक्तिक आयुष्यातील वाद पाहता, आरसीबी त्याला मैदानात उतरवणार की नाही, याबाबत साशंकता कायम आहे. आरसीबीने या प्रकरणावर अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.





