“चित्रपट निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना..” Hanuman चित्रपटाच्या टीमने घेतली CM योगींची भेट

Hanuman Movie : दाक्षिणात्य अभिनेता तेजा सज्जाचा ‘हनुमान’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट जागतिक स्तरावर हिट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केल्यानंतर ‘हनुमान’च्या टीमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. चित्रपट निर्माते प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे.
‘हनुमान’ दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि अभिनेता तेजा सज्जा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो शेअर करत प्रशांतने लिहिले, ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरांना भेटणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. हनुमान निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना तुमचे प्रोत्साहन आणि मान्यता खरोखरच प्रेरणादायी आहे. सिनेमाला सपोर्ट केल्याबद्दल आणि नवीन आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल आभार.
It was truly an honour to meet you sir @myogiadityanath 🙏
Your encouragement and recognition for our efforts in making #HanuMan is truly inspiring 🫡
Humbled to see a Leader who values the fusion of tradition and innovation in cinema, Grateful for the support and for… pic.twitter.com/rY3C215xUm
— Prasanth Varma (@PrasanthVarma) January 24, 2024
चित्रपटाची एकूण कमाई
‘हनुमान’ अजूनही थिएटरमध्ये चालू आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. चित्रपटाने भारतात 4.15 कोटी रुपयांची ओपनिंग केली आणि दुसऱ्या दिवशी दुप्पट म्हणजे 8.05 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, अजूनही कमाई सुरू आहे. ‘हनुमान’चे होम कलेक्शन अंदाजे 147.21 कोटी रुपये आहे.
‘हनुमान’ हा पौराणिक घटकांनी भरलेला सुपरहिरो चित्रपट आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे, तर विनय राय खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि राज दीपक शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.





