“पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली, आता त्यांचे फार दिवस…”; CM योगी आदित्यनाथांचा इशारा

CM Yogi Adityanath | पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले. भारतीय सैन्यदलांनी या कारवाईदरम्यान पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलं आहे.
‘पाकिस्तानचा अंत जवळ आला’
शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येच्या दौऱ्यावर आले होते. तिथे त्यांनी हनुमानगढी येथील श्री हनुमत कथा मंडपाचं उदघाटन केलं. त्यानंतर कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले की, “पाकिस्तान आता फार दिवस टिकणार नाही. तिथला दहशतवाद एकेदिवशी पाकिस्तानला बुडवेल. पाकिस्तानची ७५ वर्षे जगून झाली आहेत. आता त्यांच्याकडे फार दिवस उरलेले नाहीत, तो आपल्या कर्मांचा फळ भोगत असून त्यांचा अंत जवळ आला आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांचा धर्म विचारून हत्या केली होती, त्यानंतर भारताच्या शूर सैनिकांनी प्रत्युत्तर कारवाईत 26 च्या बदल्यात 124 दहशतवाद्यांना ठार केले.”
‘…पण कोणी त्रास दिल्या तर त्याला सोडतही नाही’
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दहशतवाद्यांना सक्त इशारा देत म्हंटले की, “हा नवा भारत आहे, जो कुणाला त्रास देत नाही, पण कोणी त्रास दिल्यास त्याला सोडतही नाही. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावले आहे. आपल्या सुरक्षा दलांनी पाकिस्तानचं मोठे नुकसान केलं, पाकिस्तानचे स्वतःचे काहीच नाही, सर्व कृत्रिम आहे. कृत्रिम गोष्टींचे आयुष्य जास्त नसते. पाकिस्तान लवकरच संपुष्टात येईल,” असेही ते म्हणाले. CM Yogi Adityanath |
हेही वाचा:
Mukul Dev Death: सिनेविश्वावर शोककळा…. प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव काळाच्यापडद्याआड





