“ते पाकिस्तानी की भारतीय, समजतच नाही?” ; पहलगाम हल्ल्यावरून योगींचा अखिलेशवर हल्लाबोल

Yogi Adityanath on Akhilesh Yadav। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज देवरियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करत विरोधी समाजवादी पक्षावर (सपा) जोरदार हल्ला चढवला. देवरियामध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जातीच्या मुद्द्यावर सपावर निशाणा साधला.
योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल करताना, “हे लोक जातीबद्दल बोलतात पण सत्तेत आल्यावर ते तुष्टीकरण धोरणाच्या मर्यादा ओलांडतात आणि फक्त त्यांच्या कुटुंबांच्या हिताबद्दल बोलतात.” असे म्हटले. तसेच मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, “२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता.” ते म्हणाले की, “समाजवादी पक्षाचे लोक याबाबत सर्व प्रकारची विधाने करत आहेत. कधीकधी हे विधान समाजवादी पक्षाच्या नेत्याने केले आहे की पाकिस्तानच्या प्रवक्त्याने केले आहे हे निश्चित करणे देखील कठीण होते. “असे म्हणत मोठा हल्लबोल केला. Yogi Adityanath on Akhilesh Yadav।
त्यांनी पुढे बोलताना,” या हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सीएम योगी म्हणाले की, जेव्हा पत्रकारांनी सपा अध्यक्षांना विचारले की ते कानपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घरी जाणार का? म्हणून ते (सपा अध्यक्ष) म्हणतात की ते आमच्या पक्षाचे नव्हते. त्यांनी म्हटले की हे किती लज्जास्पद विधान आहे.” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली.
या अगोदर, मुख्यमंत्री योगी यांनी देवरियामध्ये ५०१ विकास योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. देवरियाला विकास प्रकल्पांची भेट दिल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेला संबोधित करत होते. Yogi Adityanath on Akhilesh Yadav।





