Hanuma Vihari Statement : “अभिषेकसाठी एक अन् संजूसाठी वेगळा न्याय का?”; झिम्बाब्वे मालिकेनंतर हनुमा विहारीचा बीसीसीआयला थेट सवाल!
Hanuma Vihari Statement : भारताचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने टीम निवडीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Hanuma Vihari Statement On Sanju Samson And Abhishek Sharma Team India Selection T20I : भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशी खिशात घातली असली, तरी सलामीवीर अभिषेक शर्माचा खराब फॉर्म चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेत अभिषेकने १, ८ आणि २ अशा अवघ्या ११ धावा केल्या. अभिषेक सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला मिळणाऱ्या संधींवर भारताचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने (Hanuma Vihari) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अभिषेकला सातत्याने पाठिंबा दिला जातो आणि संजू सॅमसनसाठी (Sanju Samson) वेगळे निकष लावले जातात, असा गंभीर आरोप विहारीने केला आहे.
“वर्ल्ड कपपूर्वी संजूला बाहेर काढले, मग अभिषेकलाच का संधी?”
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हनुमा विहारी म्हणाला, “२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपपूर्वी केवळ ५ सामन्यांत धावा न केल्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग-११ मधून बाहेर काढण्यात आले होते. नंतर संजूला संधी मिळाली आणि तो थेट ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ ठरला. संजूने वर्ल्ड कपमधील तिन्ही सामन्यांत सलग अर्धशतके झळकावून भारताला विजेतेपद मिळवून दिले. तरीही त्याला वैभव सूर्यवंशीसाठी संघातून बाहेर बसवण्यात आले. मग ५ सामन्यांत सर्वोच्च १६ धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला एवढ्या संधी का दिल्या जात आहेत?”
गेल्या १८ सामन्यांत अवघी ३ अर्धशतके –
Hanuma Vihari strikes again
— 𝙋𝘼𝙉𝘿𝙐 𝙂𝘼𝘿𝙐 (@twtv_18) July 26, 2026
इंग्लंड दौऱ्यातील आणि वर्ल्ड कपमधील अभिषेकच्या आकडेवारीवर बोट ठेवत विहारी म्हणाला, “इंग्लंडविरुद्ध एका अर्धशतकाशिवाय अभिषेकला २०-३० धावांचा टप्पाही गाठता आला नाही. गेल्या ६ सामन्यांत त्याचे एक अर्धशतक आहे आणि वर्ल्ड कप धरून गेल्या १८ पार्यांमध्ये त्याच्या नावावर अवघी ३ अर्धशतके आहेत. जेव्हा संजूचा विषय येतो तेव्हा सातत्याचे कारण दिले जाते; परंतु संजू मोठ्या आणि हाय-प्रेशर सामन्यांमध्ये देशाला विजय मिळवून देण्याची धमक ठेवतो.”
मागील पाच टी२० आंतरराष्ट्रीय डावांमधील अभिषेक शर्माची आकडेवारी:
- ८ धावा विरुद्ध झिम्बाब्वे (२६ जुलै, २०२६ – दुसरा टी२० सामना)
- १ धाव (८ चेंडू) विरुद्ध झिम्बाब्वे (२३ जुलै, २०२६ – पहिला टी२० सामना)
- ३ धावा (५ चेंडू) विरुद्ध इंग्लंड (११ जुलै, २०२६)
- १६ धावा (१४ चेंडू) विरुद्ध इंग्लंड (९ जुलै, २०२६)
- १० धावा (७ चेंडू) विरुद्ध इंग्लंड (७ जुलै, २०२६)





