Gyaneshwari Silver Medal : ज्ञानेश्वरी यादवने पदार्पणातच रचला इतिहास! ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं रौप्यपदक
Gyaneshwari Silver Medal : भारताची युवा वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Gyaneshwari Yadav Wins Silver Medal Weightlifting Glasgow CWG 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) भारतीय वेटलिफ्टर्संचा पदकांचा धडाका सुरूच आहे. आता भारताची युवा वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने (Gyaneshwari Yadav) महिलांच्या ५३ किलो वजनी गटात रौप्यपदक (Silver Medal) पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळवलेल्या ज्ञानेश्वरीने आपल्या पदार्पणातच एकूण १९९ किलो (स्नॅच ८८ किलो + क्लीन अँड जर्क १११ किलो) वजन उचलून रौप्यपदकावर नाव कोरले.
वडिलांनी २०-२० तास काम करून पूर्ण केले स्वप्न –
छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यातील भोंडिया गावची रहिवासी आणि सध्या छत्तीसगड पोलिसात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) असलेली ज्ञानेश्वरीची ही वाटचाल अत्यंत संघर्षाची राहिली आहे. तिचे वडील दीपक यादव हे स्वतः बॉडीबिल्डर होते, पण कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांना खेळ सोडावा लागला. ते विजेचे काम (इलेक्ट्रिशियन) करून कुटुंब चालवत असत. ज्ञानेश्वरीच्या ट्रेनिंगसाठी आणि डाएटसाठी त्यांनी २०-२० तास काम केले. कोविडच्या काळात सप्लीमेंट्स खरेदी करायला पैसे नसताना मित्रांकडून उधार पैसे घेऊन त्यांनी तिचा सराव अखंड सुरू ठेवला.
CWG Day 5 Result | Weightlifting
Khelo India athlete Gyaneshwari Yadav secures Silver Medal with a total lift of 199 kg (88 kg Snatch + 111 kg in Clean & Jerk)
This is her personal best in Total and C&J Performance. #Cheer4Bharat #CWG2026@Media_SAI @IWF_India @IndiaSports… pic.twitter.com/ipcnp3SRqR
— DD News (@DDNewslive) July 27, 2026
जत्रेतील एका प्रसंगाने बदलले आयुष्य –
Another Silver in #weightlifting
Gyaneshwari Yadav this time! Women’s 53KG#CWG2026 #glasgow pic.twitter.com/y8uJKAJfx9— nm (@hanuberg) July 27, 2026
ज्ञानेश्वरी सातवीत असताना एका जत्रेत तिने मुलांना वेटलिफ्टिंग करताना पाहिले आणि तिथेच खेळाची आवड निर्माण झाली. ३७ किलो वजन असताना ६५ किलो स्क्वॉट आणि ९५ किलो डेडलिफ्ट करणाऱ्या ज्ञानेश्वरीने सब-ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्ण जिंकले. त्यानंतर प्रशिक्षक अजय लोहार विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तिने वेटलिफ्टिंगला सुरुवात केली.
ज्ञानेश्वरी यादवचा वेटलिफ्टिंगमधील आतापर्यंतचा प्रवास :
- २०२२: ग्रीस येथे झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक.
- २०२३: कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर आणि सीनियर सुवर्णपदक.
- २०२५: नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक.
- २०२६: एशियन चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक.





