Operation Tiger : पंजाबनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट समोर
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नाट्यमय घडामोडींचा (Operation Tiger) सिलसिला सुरूच असून, आता पुन्हा एकदा एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत.

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून नाट्यमय घडामोडींचा (Operation Tiger) सिलसिला सुरूच असून, आता पुन्हा एकदा एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्तेत सहभाग घेतला. या मोठ्या बदलांनंतर आता ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) या नव्या मोहिमेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, मंत्री संजय शिरसाट यांनी यावर अत्यंत सूचक भाष्य केले आहे.
आम आदमी पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणाबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, अनेक नेते सध्या आमच्या संपर्कात आहेत ही बाब नाकारता येणार नाही. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’ सारखी मोहिमेची घोषणा करून केली जात नाही.
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, आगामी काळात राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतो.
शिरसाट यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातील (Operation Tiger) आणखी काही खासदार किंवा नेते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी देखील हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांची जोरदार चर्चा असली, तरी शिरसाट यांनी याबाबत स्पष्ट केले की, शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांसाठी सध्या १० ते १२ इच्छुक उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये जरी वेगवेगळ्या नावांचे कयास लावले जात असले, तरी पक्षांतर्गत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. सध्या अनेक नेते आपापल्या परीने या जागांसाठी प्रयत्नशील असून उपमुख्यमंत्री शिंदे यावर अंतिम मोहोर उमटवतील, असेही त्यांनी नमूद केले. एकंदरीतच शिरसाट यांच्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






