GT vs RR : राजस्थानला मोठा झटका! पराभवानंतर BCCI ची कर्णधारासह संघावर कडक कारवाई

GT vs RR Sanju Samson fined for slow over rate in IPL 2025 : आयपीएल २०२५ चा २३ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स खेळला गेला. या सामन्यात यजमान गुजरातने राजस्थानचा ५८ धावांनी पराभव केला आणि हंगामातील सलग चौथा विजय नोंदवला. मात्र, या पराभवानंतरही, सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला २४ लाख रुपयांचा मोठा दंड सहन करावा लागला.
संजू सॅमसनला स्लो ओव्हर रेटसाठी मोठा दंड –
नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, तो त्याच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा असल्याने, सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघ सऱ्यांदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला. त्यामुळे कर्णधार सॅमसनसह प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडूला ६ लाख रुपये किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तुम्हाला सांगतो की, यापूर्वीही राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे त्यांचा स्टँड-इन कर्णधार रियान परागला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
हेही वाचा – GT vs RR : गुजरातने राजस्थानचा पराभव करत गुणतालिकेत पटकावले अव्वल स्थान! सुदर्शन-कृष्णा चमकले
यासोबतच, संजू सॅमसन आयपीएल २०२५ मध्ये दंडाला सामोरे जाणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्या आधी, त्याच्या संघाचा स्थायी कर्णधार रियान पराग, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांना आयपीएल २०२५ मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयकडून आतापर्यंत मोठी दंडात्मक कारवाई सहन करावी लागला आहे.





