BCCI Player Pension : क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडूंना दरमहा किती पेन्शन मिळते? BCCIच्या मानधनाचे नियम अन् गणित आले समोर!
BCCI Player Pension : आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर माजी खेळाडूंना बीसीसीआयकडून नक्की किती आर्थिक मदत आणि पेन्शन मिळते, याबाबत जाणून घेऊया.

BCCI Pension Scheme For Former Indian Cricketers Monthly Allowance Medical Insurance Criteria : आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर माजी खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) नक्की किती आर्थिक मदत आणि पेन्शन मिळते, याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये नेहमीच उत्सुकता असते. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारेच नव्हे, तर प्रथम श्रेणी (First Class) क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंनाही बीसीसीआय आपल्या ‘पेन्शन योजने’अंतर्गत (BCCI Pension Scheme) दरमहा सन्मानजनक पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा पुरवते.
फर्स्ट क्लास आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंची पेन्शन!
बीसीसीआयच्या धोरणानुसार, निवृत्त झालेल्या खेळाडूंना खालीलप्रमाणे दरमहा पेन्शन दिली जाते:
Here’s a category-wise breakdown of the BCCI’s pension scheme for retired cricketers. 💰🇮🇳#BCCI #India #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/wUn4nrppxm
— Sportskeeda (@Sportskeeda) August 4, 2026
- फर्स्ट क्लास क्रिकेटर्स: प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या माजी खेळाडूंना दरमहा ३०,००० रुपये पेन्शन दिली जाते. तर २००३ पूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंना दरमहा ४५,००० रुपये दिले जातात.
- महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या माजी महिला क्रिकेटपटूंना दरमहा ५२,५०० रुपये पेन्शन मिळते.
- माजी टेस्ट क्रिकेटर्स: भारताकडून कसोटी सामने खेळलेल्या माजी खेळाडूंना दरमहा ६०,००० रुपये पेन्शनची तरतूद आहे.
ज्येष्ठ कसोटीपटूंना ७० हजार अन् वैद्यकीय मदत!
Ajinkya Rahane will receive a ₹70,000 monthly pension from the BCCI after retiring from international cricket.
Having represented India in 85 Tests, 90 ODIs, and 20 T20Is, Rahane qualifies for the highest pension bracket under the BCCI’s revised pension scheme introduced in 2022 pic.twitter.com/IuRMORCWoy— Mohd faisal (@UpdateFais31801) August 4, 2026
ज्या माजी भारतीय खेळाडूंना २५ किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे, त्यांना ‘ज्येष्ठ कसोटीपटू’ मानले जाते. अशा दिग्गजांना बीसीसीआयकडून दरमहा ७०,००० रुपये पेन्शन दिली जाते.
पेन्शनव्यतिरिक्त बीसीसीआय माजी खेळाडूंना आरोग्य विमाही पुरवते. कमीत कमी १० फर्स्ट क्लास सामने खेळलेल्या पूर्व क्रिकेटपटूंना वैद्यकीय उपचारांसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य बीसीसीआयकडून उपलब्ध करून दिले जाते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.





