GT vs RR : अहमदाबादमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा थरारक विजय; तुषारने हिरावला गुजरातच्या तोंडचा घास
GT vs RR : राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील या लढतीचा निकाल शेवटच्या चेंडूपर्यंत लागला नव्हता, मात्र अखेर राजस्थानने ६ धावांनी बाजी मारली.

GT vs RR Rajasthan Royals won by 6 runs : आयपीएल २०२६ चा ९ वा सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. २११ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. राजस्थानचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने आपल्या अनुभवाचा वापर करत टिच्चून मारा केला आणि केवळ ४ धावा दिल्या. गुजरातचा संघ २० षटकांत ८ बाद २०४ धावांपर्यंतच पोहोचू शकला, ज्यामुळे राजस्थानने ६ धावांनी निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
सलामीवीरांचा धमाका अन् जुरेलचा ‘रुद्रावतार’ –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानची सुरुवात वादळी झाली. वैभव सूर्यवंशी (३१ धावा) आणि यशस्वी जैस्वाल (५५ धावा) यांनी पहिल्या ६.२ षटकात ७० धावांची भागीदारी करून पाया रचला. कर्णधार रियान पराग (८ धावा) स्वस्तात बाद झाला, तर शिमरॉन हेटमायरने १८ धावांचे योगदान दिले. मात्र, मध्यफळीत ध्रुव जुरेलने खिंड लढवली. जुरेलने ४२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावांची स्फोटक खेळी करत राजस्थानला ६ बाद २१० धावांपर्यंत पोहोचवले.गुजरातकडून कगिसो रबाडाने २ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट्स मिळवली.
The defining moment 👊
🎥 @rajasthanroyals clinch a #TATAIPL classic by 6⃣ runs to jump to the 🔝 of the points table 👏
Scorecard ▶️ https://t.co/6D02Fh0IHv#KhelBindaas | #GTvRR pic.twitter.com/XGjFMb7bHy
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
गुजरात टायटन्स शेवटच्या षटकापर्यंत दिला लढा –
Ice in his veins 🧊
Fire in his bowling 🔥A 𝗰𝗹𝘂𝘁𝗰𝗵 𝗳𝗶𝗻𝗮𝗹 𝗼𝘃𝗲𝗿 from Tushar Deshpande 🫡
Scorecard ▶️ https://t.co/6D02Fh0IHv#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/HONB2237Kz
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली. साई सुदर्शन आणि युवा फलंदाज कुमार कुशाग्र यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची वेगवान भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये संघाच्या विकेट्स पडल्या. साई सुदर्शनने अवघ्या ४४ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या. कुमार कुशाग्रने १८ धावा आणि जोस बटलरने २६ धावा केल्या. मात्र, उर्वरित फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. अखेरीस, कागिसो रबाडा आणि राशिद खान यांनी संघाला पुनरागमन करून दिले आणि १८ षटकांत धावसंख्या १९६ पर्यंत पोहोचवली.
शेवटच्या दोन षटकात पालटला गेम –
सामन्यातील सर्वात रोमांचक क्षण शेवटच्या दोन षटकांमध्ये आला, जेव्हा गुजरात टायटन्स विजयाच्या उंबरठ्यावर होते. १८ षटकांनंतर गुजरात मजबूत स्थितीत होते, पण राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी प्रभावी निर्णायक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. गुजरातला शेवटच्या दोन षटकांत १५ धावांची गरज होती. मात्र, आर्चरने १९ व्या षटकात केवळ चार धावा दिल्या. त्यानंतर, शेवटच्या षटकात तुषार देशपांडेने केवळ चार धावा देत ११ धावांचा बचाव केला आणि सहा गडी राखून सामना जिंकला. या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे, तर गुजरातला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.





