Ashok Sharma Fastest Ball : आयपीएलला मिळाला नवा ‘रफ्तार किंग’! तब्बल इतक्या वेगाने टाकला यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू, कोण आहे तो?
Ashok Sharma Fastest Ball : जयपूरच्या मातीतील हिरा असलेल्या अशोक शर्माने आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

Ashok Sharma Fastest Ball in IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढतीत एका नव्या वेगवान गोलंदाजाचा उदय झाला आहे. जयपूरच्या मातीतील हिरा असलेल्या अशोक शर्माने अंगावर काटा आणणाऱ्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या अशोक शर्माने आपल्या वेगाने फलंदाजांना अक्षरशः नाचवले. ‘रफ्तार सिंग’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अशोकने राजस्थानच्या डावातील १६ व्या षटकात ताशी १५४.२ किलोमीटर वेगाने चेंडू फेकून खळबळ उडवून दिली. हा या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. ध्रुव जुरेलसारख्या सेट फलंदाजालाही या वेगवान यॉर्कर चेंडूने चकवले आणि संपूर्ण स्टेडियम चकित झाले.
कोण आहे हा अशोक शर्मा?
Blink and you miss it 😮
Ashok Sharma records the 𝗳𝗮𝘀𝘁𝗲𝘀𝘁 𝗯𝗮𝗹𝗹 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝘀𝗲𝗮𝘀𝗼𝗻 at 1⃣5⃣4⃣.2⃣ kmph 🔥
WATCH it here ▶️ https://t.co/coCcGMJpoq#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRR | @gujarat_titans pic.twitter.com/2JBv0nNhzu
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
अशोक शर्माचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. जयपूरजवळील रामपुरा गावातील एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म १७ जून २००२ रोजी झाला. त्याचे वडील नाथू लाल शर्मा शेती करतात. शालेय जीवनापासूनच क्रिकेटवेड्या असलेल्या अशोकने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या स्विंग आणि वेगाने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. घरगुती क्रिकेटमधील याच चमकदार कामगिरीमुळे त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे उघडले.
तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळाली खेळण्याची संधी –
⚡ 154.2 KMPH?! The Speedster Just SHOCKED IPL 2026 😳🔥
Nortje who? Rabada who? 👀
A new king of pace has ARRIVED… and batters are NOT ready! 💣Ashok Sharma for GT today bowled the fastest ball in IPL 2026 🔥#IPL #FastestBall #AshokSharma #GTvsRR #Cricket #Pace pic.twitter.com/yEbwEZT8IB
— Possible11 (@Possible11team) April 4, 2026
अशोकचा आयपीएल प्रवास सोपा नव्हता. २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला ५५ लाख रुपयांना विकत घेतले होते, मात्र त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला ३० लाख रुपयांत आपल्या संघात घेतले, पण तिथेही तो बेंचवरच राहिला. अखेर यंदा गुजरात टायटन्सकडून त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच संधीचे सोने करत जगाला आपल्या वेगाची ओळख करून दिली. ४ षटकांत ३७ धावा देऊन त्याने १ विकेट्स घेतली असला, तरी त्याच्या प्रत्येक चेंडूत असलेल्या आक्रमकतेने सर्वांना प्रभावित केले आहे.





