नगर : नगर जिल्ह्यात आज करोनाबाधितांच्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. खूप दिवसांनी नगरला आज दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. तथापि, 2 दिवसांनी पुन्हा काही सेवा सुरु होणार असल्याने नागरीकांना करोना निर्बंधांचे आणखी कडक पालन करावेच लागणार आहे. नगर जिल्ह्यात आज 4 हजार 182 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 77 हजार 286 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.07 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 3612 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 26 हजार 419 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 1018, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1945 आणि अँटीजेन चाचणीत 649 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 29, अकोले 170, जामखेड 01, कर्जत 107, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 46, नेवासा 98, पारनेर 94, पाथर्डी 138, राहता 92, राहुरी 56, संगमनेर 78, शेवगाव 02, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 51, कँटोन्मेंट बोर्ड 06, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 345, अकोले 190, जामखेड 11, कर्जत 23, कोपरगाव 72, नगर ग्रामीण 199, नेवासा 120, पारनेर 70, पाथर्डी 31, राहाता 128, राहुरी 75, संगमनेर 361, शेवगाव 24, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 143, कँटोन्मेंट बोर्ड 52 आणि इतर जिल्हा 53 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 649 जण बाधित आढळुन आले. मनपा 54, अकोले 04, जामखेड 01, कर्जत 97, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 29, नेवासा 23, पारनेर 91, पाथर्डी 24, राहाता 15, राहुरी 133, संगमनेर 03, शेवगाव 12 श्रीगोंदा 66, श्रीरामपूर 35 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 812, अकोले 107, जामखेड 126, कर्जत 35, कोपरगाव 257, नगर ग्रामीण 475, नेवासा 205, पारनेर 247, पाथर्डी 162, राहाता 354, राहुरी 243, संगमनेर 377, शेवगाव 66, श्रीगोंदा 263, श्रीरामपूर 252, कॅन्टोन्मेंट 63, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 132 आणि इतर राज्य 05 अशा रुग्णांचा समावेश आहे. करोना अपडेट्स बरे झालेली रुग्ण संख्या :1,77,286 उपचार सुरू असलेले रूग्ण : 26149 जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 2282 एकूण रूग्ण संख्या : 2,05,987