Nagar : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी मानकरी

अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड व पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ मैदानात उतरल्यावर पहिली चार मिनिटांत दोघात फक्त खडाखडी झाली. दोघेही एकमेकांना पारखत होते. एकमेकांना खाली घेण्याचा प्रयत्न करताना दोघांना 1-1 गुण मिळाला. मात्र, यात कुस्ती निष्क्रिय होत असल्याने पंचांनी महेंद्रला तीस सेकंदांचा वेळ दिला. त्यात जर त्याने गुण घेतला नसता तर प्रतिस्पर्धी पृथ्वीराजला गुण बहाल केला जाणार होता. पंचांचा हा निर्णय महेंद्राला पटला नाही. त्याने मैदान सोडले आणि दुसर्या मिनिटाला पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले. त्याच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला अन् पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी झाला.
त्याच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला अन् पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी झाला. त्यानंतर लगेच मैदानावर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. याचवेळी चिडलेल्या महेंद्रने मैदान सोडताना चार-पाच खुर्च्यांची मोडतोड केली. त्यांनतर तो पुन्हा मॅटवर उघड्या अंगाने पळत आला. त्याच्यामागे त्याचे समर्थक होते. या पळापळीमुळे काहीकाळ गोंधळ झाला. महेंद्रने पळत पळत खाली बसलेल्या पंच मंडळींकडे मोर्चा वळवला. त्याच्यामागे समर्थक होते. त्यांचा आक्रमकपणा व आरडाओरडा पाहून पोलीस त्यांच्यामागे काठ्या सरसावून पळाले. महेंद्रच्या समर्थकांना चांगलाच प्रसाद देऊन मैदानाबाहेर घालवून दिले. एवढा गालबोट वगळता कुस्ती स्पर्धा रंगतदार झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी किताबाची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
जिगरबाज वाघांचा महासंग्राम या टॅगलाईन खाली वडियापार्क मैदानात रविवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत झाली. त्याआधी माती व गादी अशा दोन्ही विभागातील अंतिम लढती झाल्या. मात्र, दोन्ही लढतींपैकी गादी विभागातील लढतींना गालबोट लागले. माती विभागात महेंद्र गायकवाड व परभणीच्या साकेत यादव यांची लढत झाली. पहिल्या तीन मिनिटांच्या फेरीत यादव दोन-एक गुणाने आघाडीवर होता. मात्र दुसर्या फेरीत गायकवाड याने सलग दोन गुण घेत तीन-दोनची आघाडी घेतली. त्यानंतर काही क्षणात गायकवाडने साकेत याला चितपट करून निर्णायक विजय मिळवला व दिमाखात महाराष्ट केसरी लढतीत त्याने प्रवेश केला.
गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ याच्या दोन्ही लढती वादग्रस्त ठरल्या. गादी विभाग अंतिम लढतीत त्याने शिवराज राक्षे याला अवघ्या 1 मिनिटात ढाक टाकून चितपट केले. विजय मिळवून महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत त्याने प्रवेश केला. मात्र हा निर्णय राक्षेला पटला नाही. त्याने लढतीचा व्हिडीओ दाखवा व त्यात माझी पाठ टेकल्याचे दाखवा, मी पराभव मान्य करतो, अशी भूमिका घेतली, पंचांनी व्हिडीओ दाखवतो म्हणाले पण दाखवला नाही, असा दावा करीत तो चिडला. त्याने पंच नितेश काबलिया यांना लाथ मारली, शिवीगाळ केली. त्यामुळे पंच संघटना पदाधिकार्यांनी त्याचा निषेध केला. यामुळेही काही काळ गोंधळ झाला होता. माझ्यावर अन्याय झाल्याची भावना राक्षेने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली व त्याने मैदान सोडले.
लढतीनंतरही गोंधळ
महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहळ दोघेही तुल्यबळ असल्याने पहिल्या 3 मिनिटांच्या वेळेत दोघांची फक्त खडाखडी झाली, त्यांनतर दुसर्या फेरीत दोघांनी एकमेकांना खाली घेण्याचा प्रयत्न केला, यात दोघांना 1-1 गुण मिळाला, पण कुस्ती निष्क्रिय करीत असल्याने पंचांनी गायकवाडला 30 सेकंदात गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धी पृथ्वीराजला गुण देण्याचा इशारा दिल्याने गायकवाड याने आक्षेप घेतला. 1 मिनिटे थांबून त्याने व त्याच्या समर्थकांनी पंचांशी वाद घातला, पण पंच निर्णयावर ठाम राहिल्याने गायकवाडने मैदान सोडले.पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले व तो नवा महाराष्ट्र केसरी ठरला.





