प्रसिद्ध मोहिनीराज मंदिराचे अध्यक्ष बनले ‘नामधारी’; मंदिरात भाविकांना सोयीसुविधांचा अभाव!

नेवासा: नेवासा शहरातील भाविक-भक्तांची अपार श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या जगप्रसिद्ध एकमेव मोहिनीराज मंदीर आहे. या मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांचे प्रधान सचिव राजे चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतलेले असल्याचे वास्तव सांगितले जाते. या मंदिरातील प्रत्येक दगड हे नक्षीने कोरलेला तसेच दगडावर विविध प्रकारच्या मूर्ती आहेत. हे मंदिर पूरातन काळातील भारतातील देखण्या मंदीरांपैकी एक आहे. मात्र, या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक-भक्तांच्या सोयी – सुविधेसाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी विश्वस्तांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे या देवस्थानचे अध्यक्षच केवळ ‘नामधारी’ बनल्यामुळे विश्वस्तांपेक्षा दुसरीच मंडळी “बिनपगारी आणि फुल अधिकारी” झाली आहेत.
विश्वस्त मंडळींपेक्षा दुसरेच आपला ‘पावर’ गाजवितांना दिसून येत असल्यामुळे देवस्थान कारभाराची चक्क वाट लागल्याचे भाविक – भक्तांतून बोलले जात आहे. त्यामुळे देवस्थान समितीवर भाविक भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
समुद्रमंथनाच्यावेळी १४ रत्ने बाहेर आली. त्यापैकी अमृत हे एक असून या अमृत वाटपाचे काम देवांनी विष्णूकडे सोपविलेले होते. श्री विष्णूनी मोहिनीचे (अर्धनारीनटेश्वर) रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरांचे वाटप केले. देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरा-समोर बसून देवांना अमृताचे वाटप, तर दानवांना सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले गेले. हे फक्त राहू व केतू या दानवांनाच लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले आणि मोहिनीरूप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले.
परंतु, त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व त्यांनी सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. परंतु त्यांचे शीर अमर झाले आणि श्री विष्णूने मोहिनीरूप घेऊन अमृताचे वाटप केले ते जगातील एकमेव ठिकाण म्हणजे नेवासा नगरी. मोहिनीराजांचे येथे भव्यदिव्य आणि देखणे मंदिर असल्यामुळे भारतातून भाविक- भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. या देवस्थानकडे अर्थिक उत्पन्नाचे स्रोत असतानाही भाविकांच्या सोयी-सुविधांकडे देवस्थान समिती दुर्लक्ष करत असल्यामुळे देवस्थान आणि पुजारी या दोन ट्रस्टवर भाविकांची प्रचंड नाराजी आहे.
मोहिनीराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक – भक्तांना देवस्थान समितीकडून साधी वाहन पार्किंग, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाणीची सुद्धा सुविधा मिळत नसून देवस्थान समितीची मोठी अर्थिक ‘कुवत’ असतांनाही भाविक – भक्तांकडे देवस्थान समिती अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. या समितीला भाविक – भक्तांचेच काही देणे घेणे नसल्याचे भक्तांतून बोलले जात असून या समितीमध्ये आता चक्क एकतर्फी कारभार सुरु आहे. यामुळे समितीचे ‘अध्यक्ष’ हेच केवळ ‘नामधारी’ बनल्यामुळे विश्वस्तांपेक्षा इतरांचीच देवस्थानच्या कारभारात चलती निर्माण झाली आहे. भाविकांतून याबाबत तीव्र नाराजीचा सुरू निर्माण झालेला असून देवस्थान समितीने याकडे लक्ष घालण्याची नितांत गरज बनली आहे.
जगप्रसिद्ध भारतातील एकमेव मोहिनीराज मंदिर नेवासा येथे असून या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साघे पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नसल्यामुळे देवस्थान समिती नेमके करती तरी काय? असा परखड सवाल भाविक – भक्तांतून उपस्थित केला जात असून देवस्थान समितीवर भक्तांतून चिड व्यक्त केली जात आहे.





