चिंबळी व कुरूळी येथे ग्रामसभा संपन्न

चिंबळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त अमृत महोत्सवांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभाग अभियानांतर्गत खेड तालुक्यातील चिंबळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली आणि महादेव मंदिराच्या सभागृहात आयोजित ग्रामसभेत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी सरपंच ज्योतीताई जैद, उपसरपंच राहुल चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी तुषार सांलूखे, तलाठी राहुल पाटील, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, कृषी प्रवेशिका, शिक्षक वृंद, ग्रामस्थ तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कुरूळी येथे लोहमार्गाला तीव्र विरोधदरम्यान, खेड तालुक्यातील कुरूळी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत तळेगाव ते उरूळ कांचन लोहमार्ग प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. या प्रकल्पामुळे गावच्या हद्दीतील कडवस्ती, गावठाण, कांबळे वस्ती परिसरातील घरे, शेतजमीन, गोदामे आणि वेअरहाऊस बाधित होणार असून, रेल्वे रूळासाठी जमीन संपादनाच्या प्रस्तावाला सर्व पशियांनेंतांनी (पक्षांनी) एकमताने विरोध केला.
कुरूळी ग्रामस्थांनी यापूर्वीच एमआयडीसी पुणे, चक्राकार रिंगरोड, राष्ट्रीय महामार्ग आणि पीएमआरडीए योजनांसाठी गावच्या गायरान जमिनी संपादित झाल्याने अनेक ग्रामस्थ भूमिहीन झाल्याची खंत व्यक्त केली. प्रस्तावित लोहमार्गामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे आणखी नुकसान होणार असल्याने शेतकरी, उद्योजक आणि ग्रामपंचायतीने एकजुटीने या प्रकल्पाला विरोध दर्शवला. ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी कविता कोतवाल आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांचा निर्धार: कुरूळी ग्रामस्थांनी लोहमार्ग प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, याबाबत पुढील कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.






