Pune District : चिंबळीत नवरात्रोत्सवात रासदांडिया स्पर्धांना प्रतिसाद

चिंबळी – येथे नवरात्र उत्सव व घटस्थापनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भैरवनाथ गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गामातेच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करून सकाळ-संध्याकाळ आरतीसोबत रासदांडियाचा कार्यक्रम सुरु आहे.
याशिवाय पद्मावती तरुण मंडळ संचलित सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात भव्य रासदांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार (दि. 22) पासून गुरुदशमी (दि. 2 ऑक्टोबर) पर्यंत रंगणार असून गावातील युवक-युवतींसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या रासदांडिया स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रथम क्रमांक – इलेक्ट्रिक स्कुटी, द्वितीय – एलईडी टीव्ही, तृतीय – फ्रिज, चतुर्थ – कुलर, पाचवा क्रमांक – गॅस शेगडी यांसारखी भरघोस बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक बनकर यांनी केले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.





