Pune District : चिंबळीत पद्मावती देवीला चांदीच्या पादुका अर्पण
Updated On:

चिंबळी – नवरात्र उत्सव व घटस्थापनेचे औचित्य साधून चिंबळी (ता. खेड) येथील प्रगतीशील शेतकरी जयसिंग बहिरट, माजी उपसरपंच दिलीप बहिरट, अंकुश बहिरट व अमोल बहिरट यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामदैवत पद्मावती देवीला चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या.
सोमवारी (दि. 22) रोजी सकाळी 10 वाजता महापूजा, अभिषेक करून या पादुकांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग, ग्रामस्थ तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि देवस्थानचे पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवताला अर्पण करण्यात आलेल्या या चांदीच्या पादुकांमुळे गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण पसरले आहे.





